शहाद्यात रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर

0

महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले स्मारकास अभिवादन

शहादा – शहादा शहरातील महात्मा फुले चौकातील महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले स्मारक येथे महात्मा फुले स्मृति दिना निमित्त मान्यवारांच्या हस्ते अभिवादन व रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच 21 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले व 200 रूग्णांनी यावेळी नेत्र तपासणी केली. सकाळी 8 पासून ते संध्याकाळच्या 5 वाजे पर्यन्त महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन करण्यासाठी मान्यवारांची उपसस्थिति सुरूच होती. नेत्र तपासणीसाठी कांतालक्ष्मी हॉस्पिटलचे डॉ. निविदिता चौधरी, सादिक पिंजारी यांनी तपासणी केली. रक्तदान शिबिर शहादा ब्लड बँकेचे डॉ.नाजिम तेली यांच्या मार्फ़त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी या अभिवादन व शिबारासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने प्रमुख पाहुणे समाज बांधव ग्रामस्त यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद नंदुरबार जिल्हा व महात्मा फुले माळी समाज मंडळ च्या सर्व पदधिकार्यांनी यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालिका उपाध्यक्षा रेखाबाई चौधरी, जि.प.सदस्य अभिजीत पाटिल, नगरसेवक मकरंद पाटिल, कृउबा समितीचे सभापती सुनील पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, नगरसेवक नाना निकुभ नगरसेवक संदीप पाटील, माजी नगरसेवक केडी पाटील राजेंद्र जव्हेरी, रविंद्र जमादार, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पाटील, यशवंत चौधरी, दिनेश खंडेलवाल, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, भरत नगराळे, अ.भा. माळी महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा माळी, जिल्हा सरचिटणीस रमाशंकर माळी, समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे, कृउबा समितीचे संचालक घनश्याम माळी, व्यापारी आबा माळी, शहराध्यक्ष जगदीश माळी, ईश्वर वारुळे, सुभाष वारुळे, सुमनबाई वाघ, प्रमिला वाघ, दिपमाला नगराळे, कविता कुवर, उषा माळी, किरण माळी, मधुकर मिस्तरी, झुलेलाल पतसंथाचे सेक्रेटरी अनिल महाले, गुलाब मिस्तरी, कॉन्ट्रक्टर राजेंद्र जाधव, ईश्वर पाटील, पंडित जाधव, जिल्हा सदस्य शहाजी देसले, शरद गायकवाड़, अशोक जगताप, भास्कर देवरे, ईश्वर माळी, अनिल कुवर, सुरेश माळी, आसाराम माळी, नेत्रदीप कुवर, माजी सरपंच वासुदेव माळी, मनोज माळी, वासुदेव माळी, हेरभ ट्रस्टचे अध्यक्ष हीरालाल माळी, सी.एम.माळी, विजय माळी, प्रवीण देवरे, प्रवीण वाघ, आन्ना महाजन, डी.डी.महाजन, दीपक बागुल, संजय महाले, हमीद खॉ पठाण ,पवन माळी योगेश माळी आदि मान्यवरांनी यावेळी महात्मा फुले यांना अभिवादन केले.

Copy