शहाद्यात मोटारसायकल चोरीचे सत्र थांबेना; नागरिक भयभीत

0

शहादा । शहादा शहरातून दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. या चोरीच्या प्रकरणात चोरांची नजर ही विशिष्ट बाईकवर असल्याचे निदर्शनास आले आहे. चोरांनी शहाद्यात होंडा कंपनीच्या शाईन गाडीला प्रथम पसंती क्रमांक दिला असून शाईन गाडी चोरीची पाचवी घटना आहे.माहिती अशी की भगवान पाटील रा.विद्याविहार ता.शहादा या इसमाची होंडा शाईन कंपनीची मोटर सायकल क्र.एम एच 39 ू 8759 दि.27 एप्रिल रोजी राञी कंपाऊंडमध्ये लावली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सदर इसमाने गाडीचा शोध घेतला असता कुठेही गाडी मिळून आली नाही. दि.8 मे रोजी याबाबत शहादा पोलिसात गाडी चोरून नेल्याची नोंद केली आहे. पुढील तपास हवलदार सुनिल पाडवी करीत आहे. शहरात घरफोडी व मोटर सायकल चोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून चोरट्यांना खाकीचा धाक राहिला नसल्याने अशा घटनात वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.