शहाद्यात जंतुनाशक फवारणी

0

शहादाः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. शहादा नगरपालिका प्रशासन ठिकठिकाणी जंतू नाशकाची फवारणी करत आहेत. व्यक्तिगत स्वरूपात ट्रॕक्टर पालिकेला देवून फवारणी कामी मदत केली आहे. शहादा शहरात संचारबंदीचे नियम पाळले जात असून पालिका प्रशासन कंबर कसून कोरोना संदर्भात उपाय योजना करीत आहेत.

फवारणीसाठी शहरातील गुजर गल्लीतील रहिवासी मनोज भाईदास पाटील यांनी फवारणी कामी आपले ट्रॕक्टर दिले आहे.तसेच विशिष्ट भागात फवारणी करणे सोपे जावे अशा पद्धतीने त्यांनी ट्रॕक्टरची रचना केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून सदर ट्रॕक्टरच्या माध्यमातून फवारणी केली जात आहे.फवारणीत अल्फागार्ड टेन हे किटक नाशक औषध वापरले जात आहे.जमिनीत निर्माण होणाऱ्या विषाणूंना नष्ट करण्यात सदर औषध उपयोगी असल्याने पुण्याहून औषध मागविण्यात आले आहे.शहरात फवारणी साठी मुख्याधिकारी श्री.वाघ,स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चव्हाण व त्यांची टीम कार्यरत आहे.

Copy