शहादा येथील कोरोना संशयित वृद्धेचा मृत्यू

0

नंदुरबार। येथील जिल्हा रुग्णालयात शहादा तालुक्यातील लांबोळा येथील एका 62 वर्षीय कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला दोन दिवसांपूर्वी खाजगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर होती. तिचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्रलंबित आहे. महिला लांबोळा ता.शहादा येथील असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

Copy