शहादा पं.स.च्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेतांना अटक: आठवड्यातील दुसरी घटना

0

नंदुरबार:शहादा येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंत्याला ठेकेदाराकडून दहा हजाराची रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज 17 रोजी कार्यालयातच ही कारवाई केली. नंदुरबार पंचायत समितीच्या अभियंत्यास देखील 85 हजार रुपयांची लाच घेताना तीन दिवसांपूर्वी

अटक करण्यात आले होते. एकाच आठवड्यात ही दुसरी कारवाई असल्याने लाचखोर कर्मचाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.
ठेकेदार असलेल्या तक्रारदाराने होळ गुजरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टेबली ग्रामपंचायत मार्फत पाण्याचा हौद व शौचालय बांधण्याचे काम केले होते. त्याचे एकूण बिल 6 लाख 43 हजार झाले असून पैकी 1

लाख   शासनाकडून ऍडव्हान्स म्हणून मिळाले होते . उर्वरित 5 लाख 43 हजार बाकी होते. तक्रारदार यांच्या नमूद कामाच्या बिलाच्या फाइल वर सह्ययक अभियंता लोकसेवक ईश्वर पटेल यांची सही बाकी असल्याने बिल मंजूर होत नव्हते. तक्रारदार यांनी अभियंता पटेल त्यांची भेट घेतली असता त्यांनी बिलावर सही करण्यासाठी एकूण 10 हजार रुपये लाचेची मागणी केली, त्यामुळे तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नंदूरबार येथे तक्रार दिल्या नंतर  8 जून रोजी पंच व साक्षीदार यांच्या समक्ष लाच मागणी बाबत पडताळणी केली असता लोकसेवक यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे आज दिनांक 17 जून रोजी लोकसेवक ईश्वर सखाराम पटेल यांनी मागणी केल्याप्रमाणे 10 हजाराची लाच पंच व साक्षीदार यांच्या समक्ष पंचायत समिती शहादा येथील त्यांच्या बांधकाम विभागातील कार्यालयात स्वीकरतांना रंगेहात पकडण्यात आले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक  शिरिष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल अहिररराव
हवालदार उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे
दीपक चित्ते ,संदीप नावडेकर, मनोज अहिरे अमोल मराठे
ज्योती पाटील या पथकाने ही कारवाई केली.

Copy