Private Advt

शहादा तालुक्यातील अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करीत अत्याचार : आरोपीला अटक

शहादा : अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करीत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शहादा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हेमंत उर्फ गोलू रमण ठाकरे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

अपहरण प्रकरणी दाखल होता गुन्हा
शहादा तालुक्यातील उंटावद येथील बारा वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करीत गावातीलच आरोपी हेमंत उर्फ गोलू रमण ठाकरे (प्रभूदत्त नगर) याने मंगळवार, 7 जून रोजी लग्नाच्या आमिषाने पळवले होते व नंतर आरोपी हेमंत ठाकरे याने शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथे त्याच्या नातेवाईकाच्या घरी मुलीवर अत्याचार केला होता. याबाबत शहादा पोलिसात संशयित हेमंत रमण ठाकरे याच्याविरोधात अपहरण बलात्कार व लैंगिक अपराधापासून बालकांचे सरक्षण अधिनियम आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास जितेंद्र महाजन करीत आहेत.