शहर हागणदारी मुक्तीबाबत मार्गदर्शन

0

जळगाव : शहराचे जानेवरी 2017 मध्ये स्वच्छ सर्व्हेक्षण तसेच शहर हागणदारी मुक्त करणे या विषयांवर अभियानाचे संचालक उदय टेकाळे यांनी महानगर पालिकेच्या दुसर्‍या मजल्यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत अखिल भारतीय स्थानिक स्वय गटाच्या संचालिका उत्कर्षा तडवी, विशेष कार्यकारी अधिकारी विजय सनेर, नाशिक विभाग उपायुक्त विजय कुळकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी महापौर नितीन लढ्ढा, आयुक्त जीवन सोनवणे, स्थायी सभापती वर्षा खडके, महिला बाल कल्याण समिती सभापती कांचन सोनवणे, आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

31 मार्चपर्यंत राज्य हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट
स्वच्छ अभियानातंर्गत देशातील महानगर पालिका व नगरपालिका असलेल्या शहरांमध्ये 4 जानेवारी पासून स्वच्छ सर्वेक्षण होणार आहे. सदर सर्व्हेक्षणा दरम्यान शहरांची स्वच्छता नियमीत होणे, घनकचरा व्यवस्थापन व नागरिकांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध असणे या विषयांवार उदय टेकाळे, उत्कर्षा कवडी यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत जिल्ह्यातील नगर परिषदांचे मुख्याधिकारी तसेच महानगर पालिकेचे अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले. 31 मार्च पर्यंत महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट असून त्याप्रमाणे नगरपालिकांना आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. शहरातील 7 वार्ड हागणदारी मुक्त झाले असून उर्वरीत वार्ड मार्च 2017 पर्यंत हागणदारी मुक्त होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.