शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने कसली कंबर

0

वरणगाव : वरणगाव शहर हे पूर्वीपासून हगणदारीच्या विळख्यात गुतलेले असून शहरातील प्लॉट भाग सोडला तर इतर भागातील गावठाण असल्याणे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच माध्यमातून नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्षांनी संधी साधून महाराष्ट्र स्वच्छ अभियान अतर्गत शहर हगणदारी मुक्तीचा निर्धार केला असून शहरातील प्रभागात 600 नागरीकांना लाभ मिळणार आहे.
शहरात गावठान भागाचे प्रमाण जास्त असल्याने शहरातील हगणदारी मुक्तीसाठी लोकप्रतिनीधींनी प्रयत्न केले होते. त्याचे कोणतेच फलीत दिसून न आल्याने शहर हे हगणदारीच्या विळख्यात होतें. मात्र नवनिर्मित पालिकेचे मुख्यधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्षा अरुणा इंगळे, आरोग्य सभापती माला मेढे, नगरसेवीका वैशाली देशमुख, नगरसेवक सुनिल काळे, सामाजीक कार्यकर्ता मिलींद मेढे, राजू गायकवाड यांच्यासह नागरीक उपस्थित होते. केंद्र शासनाच्या पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा व त्यांच्या योजनेचा पुरेपुर फायदा घेत नागरीकांच्या घरात शौचालय बांधून देण्याचा निर्धार केला आहे.

17 हजार रुपयांचे अनुदान
येथील नगरपरिषद व केंद्र राज्य सरकारच्या माध्यमाध्यमातून स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येक लाभाथ्याला 17 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार असुन सिध्देश्वर नगर व सम्राट नगर मधील 12 रहिवांशानी या योजनेचा लाभ घेतला. स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी केद्र व राज्य सरकारकडील 12 हजार व नगरपरिषदेकडून 5 हजार असे 17 हजार लाभार्थीना मिळणार असुन या योजनेतंर्गत वरणगांव नगरपरिषद हगणदारीमुक्त गांव करण्यासाठी शहरातील दोन हजार लोकांना शौचालयाचा लाभ देण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे. यातील 600 लोकांच्या अनुदानाची रक्कम नगरपरिषदेला प्राप्त झाली असुन त्यातील 400 लोकांचे अर्ज नगरपरिषदेला प्राप्त झाले आहे.

सार्वजनिक शौचालयास मंजूरी

नागरिकांनी सहकार्य करावे
स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील या योजनेचा लाभ मार्च 2017 पर्यंत मिळणार असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घेवून वरणगांव शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगरध्यक्ष अरुणा इंगळे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे. ज्यांच्या घरी शौचालय नसेल आणि जागा असेल त्यांनी या अनुदानीत योजनेचा लाभ घ्यावा शहरातील महिलांना उघड्यावर शौचास बसावे लागते त्यामुळे त्यांचा त्रास दूर करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच या सर्व बाबींची पडताळणी करुन शहराचा बराचसा भाग गावठाण असल्यामुळे नागरीकांना जागेची चणचण भासत आहे.

जागेअभावी अडचण
बहुसंख्य नागरिकांकडे शौचालय उभारण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे दिसून येते. घरात वापराकरीता आहे ती जागा कमी पडत असल्याने वैयक्तिक शौचालयाची उभारणी करणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे गावठाणामधील नागरीक या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतील. तरी पालिका स्तरावरून महिलांना बांधून देण्यात आलेल्या पूर्वीच्या सार्वजनीक शौचालयाच्या शेजारी किंवा शौचालयाच्यावर पुरुषांसाठी सार्वजनीक शौचालय बांधकाम करावे अशी मागणी होत आहें. तरच खरे हगणदारीमुक्त शहर होईल.

कारवाईची आवश्यकता
वरणगाव शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे. नव्याने विकसीत झालेल्या भागात मुलभूत सोयी सुविधा मिळू शकत नाही. तसेच बहुसंख्य नागरिकांकडे वैयक्तिक शौचालयाची देखील सुविधा नसल्यामुळे या नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागते. तसेच शहरात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाल्यामुळे नागरीक याचा वापर करण टाळतात. तसेच शहराचा बहुतांश भाग हा ग्रामीण पट्ट्यात मोडत असल्यामुळे काही नागरिकांकडे सुविधा असताना देखील ते या शौचालयाचा वापर न करता उघड्यावर जाण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबी देखील लक्षात घेवून नागरिकांमध्ये शौचालयाच्या वापराबद्दल जनजागृती करण्यात येऊन त्यांना शौचालय वापराबद्दल प्रोत्साहीत करण्याची गरज आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करुन आळा घालण्यात यावे असे केल्यास शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नक्कीच चालना मिळू शकते.