शहरात ‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रम

0

नागरिकांच्या समस्या जाणून निराकरण करणार

जळगाव: शहरातील नागरिकांच्या मुलभूत समस्या जाणून घेण्यासाठी शहरात दि.23 नोव्हेंबरपासून ’उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर सुनील खडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रभागनिहाय दौरा करुन नागरिकांच्या मुलभूत समस्या जाणून निराकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दौर्‍याच्यावेळी प्रभागातील संबंधित नगरसेवक,अधिकारी सोबत राहणार आहेत.

’उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमात शहरातील रस्ते,स्वच्छता,लाईट याबाबत नागरिकांचा प्रचंड रोष आहे.त्यावर देखील लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. तसेच अमृत पाणी पुरवठा योजना,भूमिगत गटारी,प्रधानमंत्री आवास योजना,बायोमायनिंग,घनकचरा प्रकल्प आदी कामांना गती देण्यासाठी धोरणा ठरविण्यात येणार असल्याचे उपमहापौर खडके यांनी सांगितले. शहराचा संपूर्ण पाहणी दौरा झाल्यानंतर मुलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन त्याची अमंलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सुट्टीचा दिवस वगळता पाहणी दौरा करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत माजी स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा,महिला बालकल्याण सभापती रंजना सपकाळे,नगरसेविका गायत्री राणे,नगरसेवक अमित काळे उपस्थित होते.

असा आहे उपमहापौरांचा दौरा

’उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रम दि. 23 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. दि.23 रोजी प्रभाग क्रमांक 1, दि.24 रोजी प्रभाग क्रमांक 2,दि.25 रोजी प्रभाग क्रमांक 3,दि.26 रोजी प्रभाग क्रमांक 4 दि.27 रोजी प्रभाग क्रमांक 5,दि.1 रोजी प्रभाग क्रमांक 6,दि.2 रोजी प्रभाग क्रमांक 7,दि.3 रोजी प्रभाग क्रमांक 8, दि.4 रोजी प्रभाग क्रमांक 9,दि.7 रोजी प्रभाग क्रमांक 10, दि.8 रोजी प्रभाग क्रमांक 11,दि.9 रोजी प्रभाग क्रमांक 12,दि.10 रोजी प्रभाग क्रमांक 13,दि.11 रोजी प्रभाग क्रमांक 14,दि.14 रोजी प्रभाग क्रमांक 15,दि.15 रोजी प्रभाग क्रमांक 16,दि.16 रोजी प्रभाग क्रमांक 17,दि.17 रोजी प्रभाग क्रमांक 18,दि.18 रोजी प्रभाग क्रमांक 19 असा दौरा असणार आहे.

Copy