शहरात 16 हजार 325 अवैध नळजोड

0
माहिती पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांची माहिती
461 अवैध नळजोडांवर हातोडा
पिंपरी चिंचवड : महापालिकेने राबविलेल्या अवैध नळजोड सर्वेक्षणात शहरात 16 हजार 325 अवैध नळजोड आढळून आले आहे. त्यापैकी केवळ तीन हजार 391 जणांचे अर्ज पाणीपुरवठा विभागाने मंजूर केले आहेत. तर, 461 अवैध नळजोड तोडले असून कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरु आहे. ’ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजेच पाच हजार 500 अवैध नळजोड सापडले असून त्यापैकी केवळ 20 जणांनी नळ कनेक्शन नियमित करुन घेतले आहे. तसेच, 106 अवैध नळजोड तोडले असून सर्वात कमी ’अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 202 अवैध नळजोड सापडले आहेत. त्यापैकी 87 जणांनी कनेक्शन नियमित असून 35 नळजोड तोडण्यात आले आहेत. याबाबतची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली आहे.
मे महिन्यापासून अनधिकृत नळजोडचे सर्वेक्षण…
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत होत आहे. शहरात अनधिकृत नळजोडचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळ जोड केल्याने 30 ते 40 टक्के पाण्याची गळती होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच दुषित पाणीपुरवठा देखील होतो. त्यासाठी महापालिकेने मे महिन्यापासून अनिधकृत नळजोडचे सर्वेक्षण केले होते. अनधिकृत नळजोड धारकांनी नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, त्याला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. अनधिकृत नळजोडच्या सर्वेक्षणात शहरात केवळ 16 हजार 325 अवैध नळजोड सापडले. यापैकी नियमित करण्यासाठी पाच हजार 471 जणांनी अर्ज केले होते. पाणी पुरवठा विभागाने तीन हजार 391 अर्ज मंजूर केले. तथापि, शहरातील अनधिकृत नळजोडची 16 हजार ही संख्या अतिशय नगण्य असून यापेक्षा शहरात अधिक अवैध नळजोड आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अवैध नळजोड धारकांवर धडक कारवाई सुरु केली आहे. आजपर्यंत 461 अवैध नळजोड तोडले असून त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यापुढे देखील ही कारवाई तीव्र केली जाणार आहे.
प्रभागानुसार अवैध नळजोडवर कारवाई…
’अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 202 अवैध नळजोड सापडले आहेत. त्यातील 87 जणांनी कनेक्शन नियमित करुन घेतले. तर, 35 नळजोड तोडण्यात आले आहेत. ’ब’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात दोन हजार 608 अवैध नळजोड सापडले.  त्यातील 917 जणांनी नळ कनेक्शन नियमित झाले असून 53 अवैध नळजोड तोडले आहेत. ’क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दोन हजार 195 अवैध नळजोड आढळले होते. त्यातील 100 जणांनी नळ कनेक्शन निमयिम करुन घेतले. तर, 51 अवैध नळजोड तोडले आहेत. ’ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक हजार 724 अवैध नळजोड सापडले होते. त्यातील 175 जणांनी कनेक्शन निमयिम करुन घेतले असून 74 अवैध नळजोड तोडले आहेत.
पाणी पुरवठा केला बंद…
’इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक हजार 20 अवैध नळजोड सापडले होते. त्यापैकी 67 जणांनी कनेक्शन निमयिम करुन घेतले आहेत. तर, 42 अवैध नळजोड तोडले आहेत. ’फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक हजार 908 अवैध नळजोड सापडले होते. त्यापैकी एक हजार 637 कनेक्शन नियमित करण्यात आले. तर, 54 अवैध नळजोड तोडले आहेत. ’ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक हजार 168 अवैध नळजोड सापडले असून त्यापैकी 388 जणांनी कनेक्शन निमयिम करुन घेतले आहेत. तर, 46 अवैध नळजोड तोडले आहेत.  ’ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक पाच हजार 500 अवैध नळजोड सापडले होते. त्यापैकी केवळ 20 नळ कनेक्शन नियमित करण्यात आले. तर,106 अवैध नळजोड असे एकूण 461  अवैध नळजोड तोडण्यात आले आहेत. त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
Copy