शहरात साॅफ्टबाॅल संघाच्या सराव शिबिराचा समाराेप

0

विद्यापीठाच्या मैदानावर घेण्यात अाली स्पर्धा

जळगाव : भारतीय विद्यापीठ साॅफ्टबाॅल संघाचे सराव शिबिर कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मैदानावर घेण्यात अाले. या स्पर्धेचा नुकताच समाराेप करण्यात अाला. स्पर्धेला जिल्हासह राज्यभरातून खेळाडू सहभागी झाले हाेते. समाराेप साॅफ्ट बाॅल फेडरेशन अाॅफ इंडीयाचे सीईअाे डाॅ. प्रवीण अनावकर व राज्य संघाचे कार्याध्यक्ष पी. ई. पाटील यांच्या हस्ते खेळाडूंना ब्लेझर, शुज, किट देवून करण्यात अाला.

राज्य सचिव डाॅ. प्रदीप तळवेलकर, सहसचिव प्रशांत जगताप, प्रशिक्षक मिलिंद दर्प, मिलिंद तळेले, सहप्रशिक्षक सुमेध तळवेलकर उपस्थित हाते. महाराष्ट्राच्या सहा खेळाडूंचा समावेश संघात अाहे. २१ अाॅक्टाेबर राेजी हा संघ काेलकता येथून चाचणीसाठी रवाना हाेईल. संघात जळगावची शिवानी देशमुख (नुतन मराठा महाविद्यालय), सुरभी दर्प (धनाजी नाना महाविद्यालय), श्रृती जगताप (नाशिक), माेनाली नातू व प्रतिभा अरगडे (पुणे) यामिनी मांडे यांचा समावेश अाहे. कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मैदानावर स्पर्धा पाहण्यासाठी दरराेज गर्दी हाेत हाेती.