शहरात शिंपी समाजाचे पहिले बहुभाषिक परिषद

0

जळगाव : श्री संत नामदेव महाराज बहुउध्देशीय संस्था जळगाव यांच्यावतीने शनिवारी अखिल भारतीय स्तरावर शिंपी समाजाची बहुभाषिक परिषदेचे जळगावी आयोजन करण्यात आलेे आहे. नूतन मराठा महाविद्यालय बहुउद्देशीय सभागृह जळगाव येथे शिंपी समाजाची बहुभाषिक परिषद होणार आहे. या परिषदेसाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश राजस्थान दिल्ली, हरियाणा, पंजाब, आंध्र प्रदेश, उत्तराखंड व इतर काही राज्यातील सर्व शिंपी समाजाच्या पोटजातीचे प्रमुख उपस्थित राहणार आहे. शिंपी समाजाची बहुभाषिक पहिल्यादांच जळगावी होत आहे.

देशभरातील मान्यवरांची उपस्थिती
या बहुभाषिक परिषदेचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष विजय बिरारी हे भूषविणार आहे. या परिषदेसाठी चैन्नई येथील घेवरचंद तांडी (नामदेव शिंपी) भास्करराव टोणपे, अ‍ॅड.सुधीर पीसे, अ‍ॅड. किर्ती प्रभाकरराव मेरु समाज, आर. के. ड्रेसवाला जयपूर, डॉ. मोहनलाल छिपा, भोपाळ, मेजर जे.पी. वर्मा बडोदा, विमल नामदेव, के. के. गांधी हरीद्वार, पद्मासिंग ग्वाल्हेर, अशोक नामदेव कुरुक्षेत्र, बुटासिंग गोराडिया दिल्ली, मनोहरलाल नामदेव चैन्नई, राजेंद्र नामदेव म.प्र., यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बहुभाषिक परिषदेत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात येवून ठराव संमत केला जाणार आहे. बहुभाषिक परिषदेची सुरुवात दुपारी 2 वाजेपासून होणार आहे. या परिषदेसाठी ग.म. तल्हार, रामकृष्ण शिंपी, मनोज भांडारकर, विवेक जगताप, सुजित जाधव, चंद्रकात जगताप, गणेश मेटकर, परेश जगताप, प्रशांत कापुरे, दिलीप सोनवणे यासह पदाधिकारी कामकाज पाहत आहेत. या परिषदेला समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन सुजित जाधव यांनी केले आहे.