शहरात विविध ठिकाणी अँटिजेंन टेस्ट कॅम्पचे आयोजन

जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. अश्यावेळेस जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करत शासनाने टेस्ट ट्रेस अंड त्रित हा त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.ज्यामुळे जास्तीत जास्त चाचण्या होऊन बाधितांवर उपचार करून त्यांना बरे करता येईल. यासाठीच सोमवारी नूतन मराठा महाविद्यालय व नवे बस स्थानक येथे कोरोना अँटिजेंन टेस्ट कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, मनपा वैदकीय अधिकारी डॉ. शिरीष ठुसे आणि मनपा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.