शहरात लोकेशानंदजी महाराजांचे दर्शन सत्संग

0

जळगाव : शहरातील श्रीनारायण भक्ती पंथतर्फे 21 जानेवारीपासून सागर पार्क मैदानावर प्रवर्तक ब्रम्हस्वरूप संतश्री लोकेशानंदजी महाराज यांचे दर्शन सत्संग आणि भगवान श्रीनारायण यांची सर्वकल्याण महापूजेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार सुरेश दामू भोळे यांनी पत्रकारपरिषदेत दिली. यावेळी लोकेशानंदजी महाराज, सतीश भोळे, डॉ.पंकज महाजन, डॉ.वर्षा महाजन, भारती भोळे यांची उपस्थिती होती.

भव्य शोभायात्रेचे आयोजन
श्रीनारायण भक्ती पंथतर्फे जळगावात प्रथमच 21 ते 25 जानेवारीपर्यंत सागर पार्क मैदानावर संतश्री लोकेशानंदजी महाराज यांचे दर्शन-सत्संग आयोजित करण्यात आले आहे. दररोज सकाळी 7.30 ते 10.30 आणि 3.30 ते 7.30 पर्यंत भगवान श्री नारायण यांची सर्वकल्याण महापूजा आणि भक्ती उपासना करण्यात येईल. सर्वकल्याण महापूजेत मुंगीपासून भगवान ब्रम्हापर्यंत सर्वांची पूजा केली जावून मनुष्याच्या मनात देवाची भक्ती स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. सेवापूजेसाठी यजमान भक्त व्हायचे असल्यास श्रीनारायण भक्ती पंथाच्या जळगाव समितीशी संपर्क साधावा. दर्शन सत्संगच्या पूर्वसंध्येला 20 जानेवारीरोजी भगवान श्रीनारायण यांची भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेला दुपारी 2 वाजता भवानी मंदिरापासून सुरुवात होऊन सुभाष चौक, दाणाबाजार, जुने बसस्थानक, कोर्ट चौक, नवीन बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे सागरपार्क मैदानावर समारोप करण्यात येईल, अशी माहिती लोकेशानंद महाराज यांनी दिली.