Private Advt

 शहरात रस्त्याच्या कामाला सुरुवात , महापौरांनी केली पाहणी

जळगाव – जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन यांनी प्रभाग क्रमांक 8 मध्ये जाऊन रस्त्याच्या कामांची पहाणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या गुणवत्तेची पहाणी केली.

खोटे नगर परिसरातील आनंद कॉलनी मध्ये महापौरांनी यावेळी जाऊन रस्त्यांच्या कामांची पाहणी केली.

महापौरांनी केलेल्या पाहणीमुळे रस्त्याच्या कामाला गती आली असल्याचे परिसरातील नागरिक म्हणत होते.