शहरात भव्य मिरवणुकीने विश्‍वकर्मा जयंती साजरी

0

जळगाव । विश्‍वकर्मा समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री विश्‍वकर्मा यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.महाराष्ट्र विश्‍वकर्मा सेनेच्यावतीने आज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी नऊला चिमुकले राममंदिरापासून श्री विश्‍वकर्मा यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीस सुरवात झाली. सुरवातीला प्रतिमा पुजन झाले. राममंदिरापासून मिरवणुक सुरू होवून स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक मार्गाने महाबळ परिसरातील हतनूर वसाहत हॉल येथे मिरवणुकीचा समारोप झाला. मिरवणुकीत फुलांनी सजविण्यात आलेल्या बग्गीवर श्री विश्‍वकर्मा यांच्यासह संतांची चिमुकल्यांच्या वेशात असलेली सजीव आरास सार्‍यांचे लक्ष वेधत होती. मिरवणुकीदरम्यान महिलासह समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होती.