शहरात जगतगुरू संत रविदास यांची जयंती साजरी

0

जळगाव । श्री वानखेडे गुरूजी हौसिंग सोसायटी येथील संत रविदास महाराज सभागृहात शुक्रवार 10 फेब्रुवारी रोजी जगतगुरू संतशिरोमणी रविदास महाराज यांची 640वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विलास पाटील, यशवंत ठोसरे, रामलाल नेटके, संजय वानखेडे, विश्‍वनाथ सावकारे, वसंतराव नेटके, काशिनाथ इंगळे, दिलीप तायडे, साहेबराव ठोसर, प्रकाश बाविस्कर, तुकाराम बाविस्कर, संजय बाविस्कर, शाम भारूळे, भादु वानखेडे, अशोक शिंदे, कैलास वाघ आदी उपस्थित होते. यावेळी संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणकरून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, संत रविदास बहुउद्देशिय सेवा संस्था यांच्यातर्फे भास्कर मार्केट येथे जयंती साजरी करण्यात आली.

समतावादी दृष्टीकोनाची शिकवण

संजय बाविस्कर, पी. आर. आंबेडकर, विष्णु भारूळे, प्रा. विलास पाटील, यांनी संत रविदास यांच्या मानवता व समतावादी वैज्ञानिक दृष्टीकोन व त्यांची शिकवण याबाबतची माहिती दिली. याप्रसंगी अतिश तांदळे, पंढरीनाथ सावकारे, जे. वाय. सोनवणे, ज्ञानेश्वर बाविस्कर, एकनाथ सपकाळे, एल. जी. भारूळे, संतोष वानखेडे, मुरलीधर भारूळे, रमेश नेरकर, भास्कर ठोसर, अरूण नेहके, साहेबराव ठोसर, अर्जून भारूळे, विजय घुले, चिंधू परसे, काशिनाथ शेकोकारे, दिलीप इंगळे, हिरामण सोनवणे, प्रकाश बाविस्कर, एकनाथ खिरोळे, सुनील निंभोरे, विनोद निंभोरे, रमेश चव्हाण, केशव ठोसरे, संजय वानखेडे, विश्‍वनाथ सावकारे, रामलाल नेहके, वसंत नेहके, रतिराम सावकारे, एकनाथ डोळे, कैलास वाघ, शांताबाई वानखेडे, सुमनबाई सोनवणे उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय वानखेडे यांनी तर आभार कैलास वाघ यांनी मानले.

रिपाइं आठवले गट

रिपाइं आठवले गटाच्या महिला आघाडीतर्फे संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिजित पाटील जळगाव तालुकाध्यक्ष रमाताई ढिवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अनिल अडकमोल, सागर सपकाळे, पुजा चंद्रे, लता वाघ, सुरेखा बेडसे, शोभा खैरनार, रेखा जगताप निलिमा वरणकर, हर्षाली देवरे, सुलोचना माळी, लता पाटील, सविता वानखेडे, संगीता पवार आदी उपस्थित होते.