शहरात कॅन्सर रुग्णालय बांधा – माजी महापौरांची मागणी 

0
पुण्याच्या धर्तीवर पिंपरीतही माजी महापौरांची संघटना
निगडीत महापौर निवासस्थान उभारणार : राहुल जाधव
पिंपरी-चिंचवड : शहरातील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी पुण्यात जावे लागते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने शहरात प्रशस्त कॅन्सर रुग्णालय बांधण्यात यावे. त्यासाठी दोन एकर जागा आरक्षित ठेवण्यात यावी, अशी मागणी शहराच्या माजी महापौरांनी केली. तसेच माजी महापौरांसाठी पालिका मुख्यालयात कार्यालय करावे, वैद्यकीय विमा चालू करावा, पालिकेच्या कार्यक्रमांना बोलविण्यात यावे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी, मेट्रोला पिंपरी-चिंचवड मेट्रो नाव द्यावे. आंद्रा-भामा आसखेड, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावावा, अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर पुण्याच्या धर्तीवर पिंपरीत देखील माजी महापौरांची संघटना स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान, महापौरांच्या निवासस्थानासाठी निगडीत आरक्षण आहे. त्याठिकाणी महापौर निवास्थान बांधण्यात येणार असल्याचे, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.
शहराच्या माजी महापौरांच्या अनुभवाचा, त्यांच्या विकास कामा संदर्भात सूचना व मार्गदर्शन घेण्यासाठी घेण्यात आली. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महापौर ज्ञानेश्‍वर लांडगे, रंगनाथ फुगे, कविचंद भाट, आर.एस.कुमार, संजोग वाघेरे, अनिता फरांदे, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नितीन काळजे तसेच अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, डॉ. के. अनिल रॉय उपस्थित होते.
शहरात जनावरांसाठी दवाखाने चालू करावेत. रंगनाथ फुगे म्हणाले, निगडी पर्यंत मेट्रो करावी. शहरातील मेट्रोला पिंपरी-चिंचवड मेट्रो नाव देण्यात यावे. माजी महापौरांसाठी वैद्यकीय विमा चालू करावा. मेट्रो शेजारी बीआरटी आहे. त्यामधून खासगी वाहने जातात. त्याला प्रतिबंध करावा. माजी महापौरांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमावा. माजी महापौरांना दरवर्षी पाच डायर्‍या देण्यात याव्यात.
ज्ञानेश्‍वर लांडगे 
महापालिकेच्या वतीने शहरात कॅन्सर रुग्णांसाठी हॉस्पीटल बांधावे. त्यासाठी दोन एकर जागा आरक्षित ठेवावी. यासाठी खाजगी संस्था तयार असल्यास त्यांच्या मार्फत हॉस्पीटल चालवावे. कविचंद भाट म्हणाले, पालिकेच्या कार्यक्रमांना माजी महापौरांना निमंत्रित करावे. माजी महापौरांचा एका प्रतिनिधीला व्यासपीठावर बसण्यास जागा ठेवावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी पहिल्या रांगेत माजी महापौरांसाठी जागा राखीव ठेवावी. माजी महापौरांची संघटना तयार करावी. त्यांच्यासाठी महापालिकेत केबीन देण्यात यावी. माजी महापौरांची दोन महिन्यांनी मिटींग घ्यावी. माजी महापौरांच्या निवास स्थानाचे बोर्ड लावावेत.
अनिता फरांदे
माजी महापौर संघटनेचे जेष्ठ महापौरांना अध्यक्ष करावे. महापालिका सभेत माजी महापौरांनी हाथ वर केल्यास बोलण्याची संधी द्यावी. जेष्ठ नागरिक महासंघास कार्यालयासाठी, कार्यक्रमासाठी महापालिकेची जागा/ हॉल देण्यात यावा. अपर्णा डोके म्हणाल्या, सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये महिलांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. तेथे वाचनालय, स्पर्धा परिक्षा केंद्र महिलांसाठी लघु उद्योग तातडीने सुरू करावेत. शहरात सध्या डेंग्यू, स्वाईन फ्ल्यूची साथ आहे. त्यावर तातडीने उपाय योजना कराव्यात.
वैशाली घोडेकर 
शहरात सध्या पाणी पुरवठा अपूरा होत आहे. भामा आसखेड- आंद्रा प्रकल्पाचे पाणी शहरात लवकरात लवकर आणावे. पवना बंद जलवाहिनीचे काम पूर्ण करावे.
आर.एस.कुमार 
Copy