शहरात आजपासून घोषित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा

0

जळगाव । शहराला पाणी पुरवठा करणारी वाघुर पाणीपुरवठा योजनेच्या 1200 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमध्ये दोन ठिकाणी गळती झाली होती. या दोघ गळत्यांची दुरूस्ती तर पाच ठिकणी वेल्डींग जोडणची करून दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मंगळवारी संध्याकाळी जलवाहिनीची ट्रायल घेण्याचे काम सुरू होते. बुधवारपासून घोषीत वेळापत्रकानुसार सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अभियंता डि. एस. खडके यांनी दिली आहे.

सोमवारी दुरुस्तीचे काम केले होते सुरु
मेहरुणमधील विद्या इंग्लिश स्कुलजवळ तसेच शिवाजी उद्यानाजवळील दफनभूमीजवळ 1200 मिमी व्यासाची जलवाहिनीला गळती लागली होती. यामुळे दोन दिवस शोध घेतल्यानतंर जलवाहनीला दोन गळती सापडल्यात. त्यामुळे काल सोमवारीच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी मंगळवारचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. जलवाहीनीची एक गळती मोठी असल्याने त्या ठिकाणी नविन पाईपाचा तुकडा जोडण्यात आला. तर दुसरी गळती तळाला असल्याने कर्मचारी आत सोडून दुरुस्ती करण्यात आली. दोन गळत्यांसह पाच ठिकाणी वेल्डींग करुन जोडणी करण्यात आल्याची माहीती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

बुधवारी या भागात पाणीपुरवठा
नटराज टाकी ते चौघुले मळा, शनीपेठ, बळीरामपेठ, शनीपेठ, बळीराम पेठ, नविपेठ, हौसिंग सोसायटी, प्रतापनगर, गेंदालाल मिल, खडके चाळ, इंद्रप्रस्थ नगर, के.सी.पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड, भोईटे नगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी, जुनेगांव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, हेमुकलाणी टाकीवरील परिसर, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्‍वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रिम कॉलनी, डी.एस.पी. टाकीवरील तांबापुरा, गणपती नगर, आदर्श नगर, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनी.

गुरुवारचा पाणीपुरवठा
वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड, रामेश्‍वर कॉलनी, एम.डी.एस कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्सानगर, अयोध्यानगर, शांतिनिकेतन, गृहकुल कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजिंठा सोसायटी, मोहननगर, नेहरुनगर, हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, द्रोपदी नगर, मूक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी, खोटेनगर, गेंदालाल मिल, शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एस.एम.आयटी परिसर, योगेश्‍वर नगर, हिरापाईप, शंकरराव नगर, खेडीगांव परिसर, तांबापूरा, शामाफायर, वाघनगर, हरिविठ्ठल नगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर, जिल्हारोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, ऑफिसर क्लब या भागात पाणीपुरवठा होणार आहे.

शुक्रवारचा पाणीपुरवठा
खंडेराव नगर, पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबा नगर, मानराज टाकी परिसर, शिंदे नगर, अष्टभुजा, वाटीकाश्रम, निवृत्ती नगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी, नित्यानंदनगर, संभाजी नगर, रायसोनी नगर, समतानगर परिसर, सानेगुरूजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी याप्रमाणे शहरात पाणी पुरवठा होणार आहे.