शहरातून दोन मोटारसायकलींची चोरी

0

जळगाव  । शहरातील नवीपेठ परिसरातील एका व्यापार्‍याने दुचाकी घराबाहेर लावली असता अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी लंपास केली. तर गणेशवाडीतील रहिवाशाचे दुचाकी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पार्कींगमधून लंपास केल्याने जिल्हापेठ व शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुघ्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीपेठेतून व्यापार्‍याची मोटारसायकल लंपास येथील नवीपेठ परिसरातील राठी ट्रेडर्स येथील रहिवासी लक्ष्मीकांत योगेश राठी यांच्या मालकीची असलेली 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक एम.एच.19 ए.एच.1119 ही 10 जानेवारी रोजी रात्री घराबाहेर लावली असता,चोरट्यांनी लंपास केली.

जिल्हा रुग्णालयामधून दुचाकी लांबविली
येथील गणेश वाडीतील परिश्रम अपार्टमेंटमध्ये राहणारे विजय रेखा कुरवूैरे यांनी त्यांची मोटारसायकल 16 डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पार्कींगमध्ये उभी केली होती. तर सकाळी 10 ते 11.30 वाजेच्या सुमारास हिरो होंडा वैंपनीची 20 हजार रुपये विैंमतीची मोटारसायकल क्र. एम.एच.19 ए.सी. 3987 जुनी वापरती 20 हजार रुपये विैंमत असलेली अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याबाबत जिल्हापेठ पोलिस स्थानकात विजय कुरकुरे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. भटू नेरकर करीत आहे.