शहरातील 615 गृहसंस्थांना नोटीस

0

ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया अन्यथा उचल नाही

पिंपरी-चिंचवड : शहरातील दैनंदिन शंभर किलो कचरा निर्माण करणा-या गृहसंस्था आणि पाच हजार चौरस मीटर भुखंडावर वसलेल्या अशा एकूण 615 गृहप्रकल्पांना महापालिकेने कचरा वर्गीकरणाबाबत नोटीसा बजाविल्या आहेत. गृहसंस्थानी निर्माण होणारा ओला कच-यावर प्रक्रिया करावी. अन्यथा कचरा उचलला जाणार नाही. याच्या अमंलबजावणीस चालढकल केल्यास महापालिकेकडू कचरा स्वीकाराला जाणार नाही. तसेच दंडाची आकारणी केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

अनेक सोसायट्यांची टाळाटाळ

याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील सोसायट्यांनी त्यांच्याकडे निर्माण होणारा सुका व ओला कचरा वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार आणि सरकारच्या एप्रिल 2017 च्या निर्णयानुसार आपले घर, परिसर, व्यवसाय आदी ठिकाणी उत्पन्न होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे सर्वांना बंधनकारक आहे. दररोज शंभर किलोग्रॅम अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण करणा-या संघटित संस्था व सोसायट्यांनी ज्यांचे क्षेत्र पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आहे. त्यांनी कचरा निर्मितीच्या ठिकाणी कच-याचे वर्गीकरण करून स्वतः ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी निश्‍चित केलेली आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारून फक्त सुका कचरा महापालिकेकडे देण्याबाबतची माहिती देण्याची मुदत 29 सप्टेंबरपर्यंत होती.

Copy