शहरातील 13 व्यावसायिकांवर मनपाची कारवाई

0

जळगाव: शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होत आहे. प्रशासनातर्फे गर्दी न करता नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात असतांनाही व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन होतांना दिसून आल्याने मनपा प्रशासनाने दुकानांना सील करण्याची कारवाई केली. ही कारवाई मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मुलन विभागाने केली आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असून दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र व्यावसायिकांकडून पालन होताना दिसून न आल्याने उपायुक्त संतोष वाहुळे यांनी कारवाई केली असून 13 दुकाने सील केले आहेत. यात गजानन स्टुडिओ, आशापूरी सायकल मार्ट, लक्ष्मी ऑईल डेपो, अमर चाट भांडार, भैयाजी कुल्फी, जय अंबे मॉ इलेक्ट्रीकल, प्रसाद बुक डेपो, जय भोले हार्डवेअर,खुशाल सेल्स, अरिहंत अ‍ॅकॅडमी,अनंत बुक शॉप, स्टाईल झोन, महाजन झेरॉक्स या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

Copy