शहरातील 10 गणेश मंडळांचा रोटरी रेल सिटीतर्फे गौरव

0

उत्कृष्ट मूर्तीचे प्रथम पारीतोषिक न्यू चैतन्य मंडळाला तर सामाजिक संदेशात कुढापा मंडळाचा सन्मान

भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिट तर्फे स्व.रोटेरीयन प्रसन्न देव यांच्या स्मृती प्रित्यर्थ सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात उत्कृष्ठ पर्यावरणपूरक मूर्ती, सामाजिक संदेश व सजावट या तीन विभागांमध्ये शहरातील एकूण 10 गणेश मंडळांचा गौरव करण्यात आला. त्यात उत्कृष्ट मूर्ती प्रथम- न्यू चैतन्य मंडळ (विठ्ठल मंदिर वार्ड), द्वितीय- अमर बाल मंडळ तर तृतीय- संस्कृती फाऊंडेशन. सामाजिक संदेश प्रथम- कुढापा मंडळ , जुना सातारा, द्वितीय- समता मंडळ व तृतीय- आई फाऊंडेशन. उत्कृष्ट आरास- प्रथम- लोकमान्य मंडळ, ब्राम्हण संघा जवळ, द्वितीय- अष्टभुजा मंडळ, तृतीय- मातृभूमी मंडळ, शिव मुद्रा प्रतिष्ठान व सिंधी राजा मंडळ. या सर्व विजेत्या मंडळांना रोटरी चे अध्यक्ष सोनू मांडे, सचिव डॉ.मकरंद चांदवडकर , प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी रोटरी सदस्य संदीप सुरवाडे, पुरुषोत्तम पटेल, तुलसी.पटेल, विशाल ठोके, सागर वाघोदे व विजेत्या मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Copy