शहरातील रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांची डोकेदुखी

0

जळगाव। शहरात रिक्षाचालकांच्या दिवसेंदिवस अडमुठेपणाचे वागणे वाढत आहे. प्रवाशांशी एकेरी भाषेत बोलणे, शहराच्या रस्त्यावर वेगाने रिक्षा चालवितांना अनेक वेळा अपघात झालेला आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी यांच्यादेखत रिक्षात जास्तीचे प्रवाशी बसविण्याचे प्रकार हल्ली जास्त होत असून वाहतूकीचे नियम ढाब्यावर घेत आहे. रिक्षांमध्ये चालक आपल्या मर्जीनुसार प्रवाशी भरणे व रात्रीच्यावेळी अवाढव्या भाडे आकारणी केली जात आहे. त्यांच्या अडमुठेपणा व मनमार्जी कारभारामुळे शहरातील नागरीक व प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणावर हाल होत असून यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

रात्रीच्या वेळेत जास्त भाडे आकारणी
जळगाव ग्रामीण भागात तालुक्यात जाण्यासाठी बाहेरून अनेक प्रवाशी येणेजाणे करीत असतात. यामुळे शनीपेठमधील रिक्षाचा थांबा स्थापन झालेला असून त्या ठिकाणाहून ग्रामीण भागात जाण्यासाठी रिक्षा ठरलेल्या आहेत. या ठिकाणाहून रिक्षाने प्रवाशी प्रवास करीत असल्याने तसेच रात्रीच्या वेळेत काही रिक्षा चालक हे मद्यपान केलेले असता. बाहेरगावाहून आलेले प्रवासी गावातील असताना त्यांच्या कडून जास्त प्रमाणात भाडे आकारणी करण्यात येते रात्रीचा वेळ असल्याने नाईलाजाने प्रवाशी भाडे देण्यास तयार होतो. पर्यायी व्यवस्था नसल्याने रिक्षा चालकांकडून आर्थिक पिळवणुक होत आहे. प्रवाशी पूर्ण भाडे देत असताना जागा नसली तरीही आणखी एक प्रवासी घेतल्याशिवाय रिक्षा नेली जाणार नसल्याचा हट्ट रिक्षा चालकांकडून धरला जातो. अखेर प्रवाशांना मनमानी कारभार दिसून येत आहे.

रिक्षा व्यवसाय बदनाम करण्याची भावना
प्रवाशां सोबत असभ्य वर्तन करणार्‍या रिक्षा चालकांमुळे रिक्षा व्यवसाय हा बदनाम होत असल्याची भावना जनशक्तीशी बोलतांना रिक्षा चालक प्रकाश जाधव यांनी व्यक्त केली आहे. समाज मनांवर यांचा अधिक प्रमाणात असून आशा बेशिस्त चालकांवर कार्यवाही होण्याची गरज असल्याचे ते म्हटले आहे.

दुचाकी वाहनधारकांना पोलिसां कडून हेल्मेट नसल्यास कार्यवाही केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणारे, क्षमतेहून अधिक प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष होत असताना दिसून येत आहे. पोलीस मुख्यालया समोरून दिवसरात्र रिक्षा सुरू असतात. एखाद्या प्रवाशाने धोकादायक पद्धतीने होणार्‍या या प्रवासाला नकार दिल्यास त्याला रिक्षात बसायला मिळत नाही. बर्‍याच ठिकाणी शहरात अशा घटना समोर येत आहे.

मेन रोडवरच रिक्षांची पार्किंग
मेन रोडवर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असून याचा त्रास प्रवाश्यांना होत आहे. शहरात वाहतुकीची मोठी अडचण असतांना रस्त्यांमध्येच रिक्षा उभी केली जात आहे. या मुळे शहराच्या प्रमुख मार्गांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरात वाहतुकीचे थांबे ठरलेले असतांना इतरत्र ठिकाणी रिक्षा उभी करण्यात येते. त्यामुळे वाहतूक मोकळीक होण्यास अडचण निर्माण होत असून रिक्षा बजूला करण्यास सांगितले तर त्यांची एकेरी भाषेचा वापर करून उर्मट व उद्घट भाषेचा वापर करून प्रवाश्यांना मानसिक त्रास होतो.