शहराच्या हद्दित रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडता येणार

0

जळगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषण व ध्व्नी प्रदुषण रोखण्यासाठी जळगाव शहराच्या हद्दीत फटाके फोडण्यावर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. दिपोत्सव कालावधीत रात्री ८ ते रात्री १० असे दोनच तास फटाके फोडता येणार आहे. ख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागत यासाठीदेखील हे आदेश लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

Copy