शरद पवार रामद्रोही: उमा भारती

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देतांना राम मंदिरापेक्षा आजच्या स्थितीत कोरोना महत्त्वाचे आहे. काही लोकांमध्ये   राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर कोरोना जाईल असा समज असल्याचे वक्तव्य केले आहे. यावरून शरद पवार यांच्यावर टीका होऊ लागली आहे. दरम्यान भाजप नेत्या माजी मंत्री उमा भारती यांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांचे वक्तव्य मोदी विरोधी नसून राम विरोधी आहे. शरद पवार रामद्रोही असल्याची टीका उमा भारती यांनी केली आहे. शरद पवार यांच्याकडून असे वक्तव्य अपेक्षित नाही असेही उमा भारती यांनी सांगितले आहे.

राम मंदिर बांधल्याने कोरोना जाईल अशी समज काहींची आहे, मात्र सध्या कोरोना महत्त्वाचे असून सरकारने कशाला महत्त्व द्यावे हे ठरविले पाहिजे असे विधान शरद पवार यांनी केले होते.

Copy