शरद पवार यांना पद्मविभूषण

0

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजकारणात दबदबा निर्माण करणारे आणि यंदा संसदीय राजकारणातील पन्नास वर्षांची वाटचाल पूर्ण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना बुधवारी पद्मविभूषण हा देशातील दुसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सामाजिक कार्यासाठी ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारने नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या मानकर्‍यांची नावे जाहीर केली. पद्म पुरस्कार निवडीसाठी यावेळी वेगळी पद्धत अवलंबण्यात आली होती. केंद्राने गेल्या वर्षी मेमध्ये ऑनलाईन पद्धतीने यासाठीचे कौल मागवले होते. यात मिळालेल्या पाच हजार प्रवेशिकांमधून डिसेंबरमध्ये पाचशे नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली. त्यातून पुरस्कारार्थींची नावे निश्‍चित करण्यात आली.

७ जणांना पद्मविभूषण
शरद पवार यांच्याशिवाय ज्येष्ठ गायक येशुदास, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, पी.ए. संगमा, सुंदरलाल पटवा, सद्गुरू जग्गी वासुदेव आणि उडिपी रामचंद्र राव यांनाही पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक यू. आर. राव, थायलंडच्या राजकन्या महाचक्री सिरिंधोर्न, दिवंगत ज्येष्ठ पत्रकार चो रामस्वामी (मरणोत्तर), आध्यात्मिक गुरू जग्गी वासूदेव, औषधनिर्माण क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. उदवाडिया यांना पद्मभूषण जाहीर झाला आहे.

पद्मश्रीसाठी ७५ जणांची निवड
पद्मश्रीसाठी यंदा ७५ जणांची निवड करण्यात आली आहे. श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीमार्फत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी कोकणासह राज्यभरात मोठे कार्य उभे केले आहे. त्यांच्या या कार्याचा पद्मश्री देऊन केंद्राने धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव केला आहे. याशिवाय पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, गायक कैलाश खेर, शेफ संजीव कपूर, ज्येष्ठ पत्रकार भावना सोमय्या, डॉ. मापूस्कर (मरणोत्तर), क्रिकेटपटू विराट कोहली, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि कुस्तीपटू साक्षी मलिक, डॉ. भक्ती यादव, डॉ. सुब्रतो दास, बिपिन गणात्रा, गिरीश भारद्वाज, बलबीरसिंग सीचेवाल, करीमूल हक, अनुराधा कोईराला, गिनाभाई दर्गाभाई पटेल, अनंत अग्रवाल, इली अहमद, कंबल सिब्बल आदींचा समावेश आहे.

७५ जणांना पद्मश्री
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म सन्मानांची घोषणा झाली असून, सात जणांना पद्मविभूषण, सात जणांना पद्मभूषण आणि ७५ जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले आहेत. फलंदाजी आणि कप्तानी आशा दोन्ही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी करत असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला पद्मश्री सन्मान जाहीर झाला असून, विराटप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकरणारी कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्टिकमध्ये चमकदार कामगिरी करणारी दीपा कर्माकर, पॅराऑलिम्पिकपटू दीपा मलिक, हॉकीपटू पी. आर. श्रीजेश, थाळीफेकपटू विकास गौडा या क्रीडापटूंनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. त्याबरोबरच गायिका अनुराधा पौडवाल, गायक कैलास खेर, शेफ संजीव कपूर, समीक्षक भावना सोमय्या यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे.

यंदा ऑनलाईन नामांकने
पद्म पुरस्कारांच्या निवडीसाठी यावेळी वेगळी पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. केंद्र सरकारने मागील वर्षी मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने पद्म पुरस्कारांसाठीचे कौल मागवले होते. यात मिळालेल्या तब्बल पाच हजार प्रवेशिकांमधून डिसेंबर महिन्यात ५०० नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली. क्रीडा, मनोरंजन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या लक्षवेधी कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करून देशाचे नाव उंचावणार्‍या मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.