शरद पवार महाराष्ट्राला लागलेले कोरोना:गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य

0

सोलापूर:- भाजपा विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.

शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“सरकार वेगवेगळ्या समाजासंबधी वेगवेगळी भूमिका घेत आहे. धनगर समाजाचे प्रकरण न्यायालयात असतानाही वकील दिला नाही. राज्यात दोन क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाची ही परिस्थिती असेल तर इतर छोट्या घटकांची काय परिस्थिती असेल हे सांगायची गरज नाही. लोकांना आता शरद पवारांची भूमिका कळू लागली आहे. करोना संकट संपल्यानंतर शरद पवारांविरोधात आंदोलन करु,” असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

Copy