शरद पवारांच्या समर्थनार्थ जळगावात राष्ट्रवादी रस्त्यावर !

0

कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरोधात शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीच्या काळात सरकारकडून ईडीचा विरोधकांना बदनाम करण्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप होत आहे. पवारांवर दाखल झालेल्या गुन्हाच्या निषेधार्थ आज जळगाव शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर महामार्गावर टायर जाळण्यात येऊन निदर्शन करण्यात आले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शरद पवारांच्या समर्थनार्थ जळगावात राष्ट्रवादी रस्त्यावर ! 1

यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, योगेश देसले, अभिषेक पाटील, कल्पना पाटील आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

Copy