शरद पवारांची कोरोना चाचणी; रिपोर्ट…

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावरील सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे शरद पवारांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही माहिती दिली. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली.

शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये सुरक्षा रक्षकांसह स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा समावेश आहे. यामुळे शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपेंनी दिली. कोरोनाची लागण झालेल्यांवर उपचार सुरू असून ते राहत असलेल्या परिसरात आलेल्या व्यक्तींच्या कोरोना चाचण्यादेखील करण्यात येणार असल्याचे टोपेंनी सांगितले.