शरद पवारच सरकार चालवताय: चंद्रकांत पाटील

0

सांगली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाढीव वीज बिल कमी करण्याच्या तसेच दुधाला दर वाढ देण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी ‘शरद पवार हेच सरकारचे निर्णय घेतात, त्यांनाच भेटा’ असा सल्ला दिला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. सांगलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, दुसरीकडे शरद पावर हे राज्यभर फिरत आहेत. त्यामुळे शरद पवार हेच राज्य सरकार चालवत असल्याचे दिसून येते असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

विरोधी पक्षाचे नेते अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्या सोडविण्याची मागणी करतात. मात्र आताचे मुख्यमंत्री आमच्या पत्रांना उत्तरही देत नाहीत, विरोधी पक्षाचे म्हणणे ऐकून घेण्याची परंपरा आहे. मात्र तसे होत नाहीये.

यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार हे सरकारचे डीफेंडर म्हणून पुढे येताय, सरकारची कामगिरी योग्य नसल्याने पवारांनी पुढे यावे लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला होता.