शनिपेठेतील रस्त्यांच्या कामांचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

0

जळगाव: शहरातील रस्त्यांची कामे मनपाकडून हाती घेण्यात आली असून शनिपेठ परिसरातील प्रभाग 5 मधील रस्त्याच्या कामाचा महापौर भारती सोनवणे, आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
प्रभाग क्रमांक 5 मधील 5 गल्लीतील रस्ते तयार करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने महापौर भारती सोनवणे, आ. राजूमामा भोळे यांनी बुधवारी कामाची पाहणी केली होती. गुरुवारी दुपारी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
शनिपेठेतील स्थानिक नागरिक आणि महापौर भारती सोनवणे, आ.राजूमामा भोळे यांच्या हस्ते नारळ फोडून कामाला सुरुवात झाली. यावेळी उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू भंगाळे, नितीन लढ्ढा, अ‍ॅड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, मुकुंदा सोनवणे, चेतन सनकत, अमित काळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी उपमहापौर अनिल वाणी, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, मनोज काळे, भारत सपकाळे आदी उपस्थित होते.

Copy