शनिपेठेतील जुगाराचा डाव उधळला, 8 जणांना अटक

जळगाव- ममुराबाद रोडवरील झन्ना-मन्ना जुगाराच्या अड्ड्यावर शनिपेठ पोलिसांनी रविवारी सायंकाळी 5 वाजता छापा टाकून 8 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून 2800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ममुराबाद रोडवरील तुळजाई बिल्डींगसमोरील पडक्या जागेवर काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक अमोल कवडे, हेड कॉन्स्टेबल रघुनाथ महाजन, अनिल कांबळे, गणेश गव्हाळे, अमित बाविस्कर, राहुल पाटील यांच्या पथकाने छापा टाकला. यात दीपक हिरालाल गवळी (वय 29, गवळीवाडा), प्रमोद ताराचंद गवळी (वय 28, ममुराबाद रोड, शनिपेठ), अशोक हिरालाल गवळी (वय 26, गवळीवाडा), मनोज गणेश गवळी (वय 38, कांचननगर), राजू गवळी (वय 34, गवळीवाडा), राजेश सखाराम गवळी (वय 30, रिधूरवाडा), दिनेश नंदू गवळी (दाळफळ) व राजेश उमाकांत जगताप (वय 45, हमालवाडा, शिवाजीनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2800 रुपये जप्त करण्यात आले. याबाबत कॉन्स्टेबल राहुल पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Copy