शंभरपेक्षा जास्त ग्राहकांना मिळाला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ

0

जळगाव । अस्पायर होम फायनान्स जळगाव शाखेतर्फे मोठ्या स्वरूपात ग्राहकांना पंतप्रधान आवास योजनेच्या सबसिडीचे वाटप करण्यात आलेले असून जास्तीत जास्त ग्राहकांना याचा फायदा देण्यासाठी अस्पायर शाखा प्रयत्न करीत आहे. अस्पायर होम फायनान्स शाखेने आजपर्यंत मध्यमवर्गिय लोकांना त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यास गृहकर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच आतापर्यंत सुमारे अनेक कर्जधारकांना याचा फायदा मिळाला असून हि यादी अशीच वाढत राहणार आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत कमीत कमी 2.20 लाख पर्यंत सबसिडी मिळत आहे.

पंतप्रधान योजनेसाठी पात्रता निकष याप्रमाणे
पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकार द्वारा सर्वसामान्य लोकांसाठी राबविण्यात येत आहे, या योजनेचा फायदा सर्व सामान्य व गरीब कुटुंबाना घराचं स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आहे. 1. व्यक्तीच्या नावे दुसरे घर किंवा कर्ज नसावे. 2. घरातील सर्व सदस्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न 6 लाख असावे. 3. घरातील सर्व सदस्य म्हणजे पती,पत्नी व त्यांचे अविवाहित मुले. 5. योजनेचा फायदा एका व्यक्तीला एका खरेदीवरच घेता येईल. 6. सबसिडी कर्ज खात्यात जमा करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजने संदर्भात समज गैरसमज.

पंतप्रधान योजनेसाठी पात्रता निकष याप्रमाणे याबाबत चर्चा करून माहिती देवून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही योजना केंद्र सरकार मार्फत राबविली जात असून सर्व माहिती एनएचबी मार्फत सरकारला पुरविली जाते. सदरील योजना अविवाहित, विधवा, गरजू व्यक्तींना व घटस्फोटीत व्यक्तींना या योजनाचा लाभ घेता येईल.

योजनेचा फायदा घेण्यासाठी उत्पन्न मर्यादा
_मासिक 50 हजारापेक्षा पगार कमी असलेली व्यक्ती किंवा 6 लाख वार्षिक उत्पन्न असणारी व्यक्ती असून कर्ज घेण्यासाठी असणार्‍या सर्व नियमात बसणारे सर्व व्यक्तींना मिळू शकते. पंतप्रधान आवास योजनेचा फायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये जळगाव अस्पायर शाखेने सर्वात जास्त लोकांना (ग्राहकांना) याचा फायदा आजपर्यंत करून दिलेला आहे.

शाखेकडून स्वतः हुन ग्राहकांना या योजनेची कल्पना दिली जात असून रक्कम जमा झाल्यांनतर पूर्ण प्रक्रिया केली जात आहे. त्यासाठी शाखा व्यवस्थापक प्रमोद चव्हाण, क्रेडिट मॅनेजर अनिल पाटील व अकाउंटंट रोहित कटारिया सोबत अस्पायर होम फायनान्स चे सर्व कर्मचारीवृंद परीश्रम घेत आहे.