व्हेलोटीच्या माघारीने भांब्री उपांत्यफेरीत

0

झुहाई। भारताच्या युकी भांब्रीने झुहाई चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीकडे वाटचाल केली आहे. भांब्री आघाडीवर असतांना अर्जेटिनाच्या व्हेलोटीअतिश्रमामुळे या स्पर्धेतून माघारी घेतली आहे. या सामन्यात युकी भांब्रीने 6-1,2-1 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या सुरुवातीपासूनच अर्जेटिनाच्या व्हेलोटीला थकवा जाणवत होता. त्यामुळे त्याला युकीच्या आक्रमक खेळापुढे फारसा प्रभाव दाखवता आला नाही. केवळ 47 मिनिटे चाललेल्या या सामन्यात युकीने पासिंग शॉट्सचा उपयोग करीत पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्र्हिसब्रेक मिळवला. त्याने परतीच्या खणखणीत फटक्यांबरोबरच बिनतोड सव्र्हिसचाही उपयोग केला.“व्हेलोटी हा खूप दमला आहे, हे मला पहिल्या सेटपासूनच जाणवत होते, तरीही जिद्दीने त्याने पाऊण तास खेळ केला हेच माझ्यासाठी आश्चर्यजनक होते,” असे सामना संपल्यानंतर युकीने सांगितले.

जोकोव्हिचचे आव्हान
भारताचा रोहन बोपण्णा व उरुग्वेचा खेळाडू पाब्लो क्युवास यांना इंडियन वेल्स मास्टर्स एटीपी टेनिस स्पर्धेतील दुहेरीत जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाचा खेळाडू नोव्हाक जोकोव्हिच व व्हिक्टर त्रिओकी यांच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.भारताचा अनुभवी खेळाडू लिएण्डर पेस हा अर्जेटिनाचा ज्युआन-मार्टिन डेलपोत्रोच्या साथीने खेळत असून, त्यांना लक्झेम्बर्गचा गिलेस म्युलर व अमेरिकेचा सॅम क्युएरी यांच्याशी खेळावे लागेल. क्युएरीने नुकत्याच झालेल्या एटीपी स्पर्धेतील अंतिम फेरीत राफेल नदालवर मात केली होती.