व्हेंटीलेटर अभावी महिलेच्या मृत्यू; निलकमल हॉस्पिटलमध्ये तोडफोड

0

जळगाव: कोरोनाबाधित असल्याने उपचार सुरू असतांना संगिता पांडूरंग पाटील (50) रा. जिल्हा बँक कॉलनी या महिलेचा उपचारादम्यान मृत्यू झाला. या महिलेला आवश्यकता असतांनाही व्हेंटीलेटरची सुविधा न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत डॉक्टरवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत संतप्त नातेवाईकांनी निलकमल हॉॅस्पिलटमध्ये तोडफोड केल्याची घटना रविवारी दुपारी 12 वाजता घडली. यादरम्यान गोंधळ घालणार्‍या नातेवाईकांनी इतर रुग्णांना लावलेली ऑक्सिजन सिलेंडरही काढून फेकले. या तोडफोडमध्ये मध्ये एका तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा घेतल्याने गोंधळ निर्माण झाला होता. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षकासह कर्मचार्‍यांनी भेट देत पाहणी केली. व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.