व्हॅलेंटाईन डे वर बंदी आणण्याची मागणी

0

भुसावळ । येथील हिंदू जनजागृती समितीतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली शाळा, महाविद्यालयात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी या ऐवजी शाळा महाविद्यालयांमध्ये मातृ पितृ पूजन करण्यात यावे. उत्तराखंडमध्ये शासकिय कर्मचार्‍यांना कार्यालयीन वेळेेत प्रार्थनेसाठी सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो रद्द करण्याची मागणी देखील केली आहे.

मलकापूर प्रकरणाची चौकशी करावी
मलकापूर येथे झालेल्या दंगलीत येथील धर्मांधांनी पाकिस्तानची नारेबाजी आणि भारताविरुध्द घोषणा देवून वातावरण भडकविले होते. मात्र याप्रकरणी राजकीय पुढार्‍यांच्या हस्तक्षेपामुळे निरपराध हिंदू तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले याची चौकशी करण्यात यावी. एमसीईआरटी च्या अभ्यासक्रमात जातीय तेढ निर्माण करणारी आणि विद्यार्थ्यांची मने कलुषित करणारी माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने या अभ्यासक्रमाची तपासणी करुन समाजात जातीय तेढ निर्माण होवू नये याकरीता हा अभ्यासक्रम रद्द करण्यात यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. या निवेदनावर उमाकांत शर्मा, मिलींद कापडे, भुषण महाजन, मयुर बर्‍हाटे, सोनी ठाकूर, उमेश जोशी, अक्षय पाटील, सुमित झांबरे, कुमार भारंबे, निखिल मराठे, देवेंद्र पाटील आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.