व्हीआयपी नंबरच्या स्कॉर्पिओमध्ये सापडल्या मद्याच्या बाटल्या

0

जळगाव– गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तपासणी करण्यासाठी गाडी थांबविली असता, पोलिस कर्मचार्‍यांना न जुमानता पळण्याच्या प्रयत्नातील व्हीआयपी क्रमांकाच्या चारचाकीला पोलिसांनी पाठलाग करुन चंदू आण्णानगरजवळ पकडले आहे. या गाडीत मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. सोमवारी सायंकाळी तालुका पोलिसांची ही कारवाई केली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर निमखेडी टी पॉईंट याठिकाणी पोलीस कर्मचारी दिपक कोळी व शाम बोरसे कर्तव्य बजावत होते. मंगळवारी सायंकाळी एम.एच.24 ए.एफ 1919 अशा व्हीआयपी क्रमाकांची चारचाकी आली. तपासणीसाठी कर्मचारी कोळी व बोरसे यांनी ही गाडी थांबविली. चालकाने पोलिसांना न जुमानता चारचाकी पळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर कर्मचार्‍यांनी पाठलाग करुन चंदूआण्णानगराजवळ ही चारचाकी पकडली. यानंतर गाडीची तपासणी केली असता त्यात डीप्लोमॅटच्या मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. यानंतर कर्मचारी चारचाकीसह चालकाला पोलीस ठाण्यात नेले. याबाबत माहिजी जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात पोलीस केला असता, पोलीस निरिक्षक येत आहेत, तसेच राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी येत असून कार्यवाही सुरु असल्याची माहिती मिळाली. नेमकी चारचाकी कुणाची? यात मद्याच्या बाटल्या कुठून व कशा आल्या? हे मात्र कळू शकलेले नाही. पोलीस तपासात हे समोर येणार आहे.

शनिपेठ पोलीस निरिक्षकांनी पकडले होती चारचाकी

शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांनी रविवारी पहाटे 3.30 वाजेदरम्यान कोंबडी बाजार परिसरात संशयितपणे फिरणार्‍या कारचा पाठलाग करून 88 हजार 300 रुपयांच्या मद्यसाठा जप्त केला. या वेळी चालकाने कार सोडून धूम ठोकली. पोलिसांनी पकडलेल्या मद्यसाठ्यात व्हिस्की, स्कॉच, रम, ओडका अशा 35 प्रकारच्या मद्याचे ब्रँड आहेत. तर एक लिटरच्या पाण्याच्या 30 बाटल्यांमध्येही मद्य भरलेले आढळून आले. या मद्याची किंमत हजारो रुपये आहे. पोलिस निरीक्षक ससे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालक, मालकाविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Copy