[व्हिडीओ] पोलीस, आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटतेय अन् नागरिकांचा निर्लज्जपणाचा कळस

0

बाजार समितीत भाजीपाला विक्रेत्यांची गर्दी दुर्घटनेला देतेय निमंत्रण; सोशल डिस्टन्स तर सोडाच कुठल्याही नियमांचे पालन नाहीच

जळगाव– कोरोना शी दोन हात करण्यासाठी पोलीस यंत्रणा तसेच आरोग्ययंत्रणा आपल्यासाठी अहोरात्र झटतेय. मात्र याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याने दुसरीकडे नागरिकांनी गर्दी करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. कारवाईनंतरही बुधवारी सकाळी पुन्हा बाजार समितीत भाजीपाला विक्रेत्यांनी कुठल्याही आदेशाचे पालन न करता मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती . जणू हे भाजीपाला विक्रेते दुर्घटनेची वाट पाहत असल्याचे चित्र दिसून आले .

जिल्हा प्रशासनाने कठोर भुमिका घ्यावी

भाजीपाला अत्यावशक सेवा आहे त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कुठले प्रकारची बंदी केलेली नाही. मात्र गर्दी करू नये तसेच सोशल डिस्टन्स सह कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणुन आदेशांचे पालन करावे, असे म्हटले आहे. मात्र सर्व नियम आदेश धाब्यावर बसून भाजीपाला विक्रेते जुमानत नसल्याचे चित्र पुन्हा बुधवारी दिसून आले. मात्र आता असला प्रकार रोखण्यासाठी व परिस्थिती हाताबाहेर जाण्यापुर्वी जिल्हा प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

नागरिक स्वत:सोबतच दुसर्‍याच्या जीवावर उठले

पोलीस हे त्यांचा परिवार कुटुंब सोडून आपल्यासाठी अहोरात्र रस्त्यावर उभे आहेत .दुसरीकडे डॉक्टर्स सिस्टर्स परिचारक हे सुध्दा रात्रंदिवस सेवा देत आहे. असे असतांना नागरिक कुठल्याही प्रकारे संवेदनशील नसुन गर्दी करुन विनाकारण बाहेर फिरुन स्वत;सोबतच दुसर्‍याच्या जिवावर ऊठले आहे.

Copy