व्यापारयुध्द : कोरोनावरुन अमेरिकेची चीनला धमकी

0

वॉशिंग्टन: कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून चीनने व्यापार करारातील आपत्तीच्या कलमाचा आदर केला नाही, तर व्यापार करार रद्द करण्यात येईल, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

आयात-निर्यातीतील तफावतीमुळे, ट्रम्प यांनी चीनमधून येणार्‍या वस्तूंवरील आयातशुल्कामध्ये वाढ केली होती. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू झाले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये जानेवारीत व्यापार करार झाला. त्यानुसार चीनला अमेरिकेतील २०० अब्ज डॉलरची उत्पादने आयात करावी लागणार आहेत. एखादी नैसर्गिक आपत्ती आली किंवा अकल्पनीय घटना घडल्यानंतर, दोन्ही देशांमध्ये नव्याने व्यापार चर्चा होईल, असे एक कलम या करारामध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, चीन हे कलम रद्द करू शकते, असा अहवाल अमेरिका-चीन आर्थिक व सुरक्षा आढावा आयोगाने सादर केला आहे. त्यावर ट्रम्प म्हणाले, चीनने हे कलम रद्द केले, तर आम्ही त्यांच्याबरोबरील करारच रद्द करू शकतो, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

Copy