व्यवसाय परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना आवाहन

0

धुळे : राष्ट्रीय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीमार्फत होणारी शिकाऊ उमेदवारांची 105 वी अ. भा. व्यवसाय परीक्षा 6 ते 12 एप्रिल 2017 या कालावधीत होणार आहे, असे अंशकालिन प्राचार्य, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्र, द्वारा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे यांनी कळविले आहे. प्राचार्यांनी म्हटले आहे, ज्या उमेदवारांचे प्रशिक्षण 31 मार्च 2017 अखेर पूर्ण होत आहे, असे सर्व उमेदवार या परीक्षेस पात्र आहेत.

त्यांनी त्वरीत बीटीआरआय केंद्राशी संपर्क करावा व परीक्षा शुल्क जमा करावे. माजी अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी 22 फेब्रुवारी 2017 पूर्वी बीटीआरआय विभागाशी संपर्क साधून परीक्षा अर्ज भरावा. तसेच सर्व संबंधितांनी आधार कार्ड बीटीआरआय केंद्रात जमा करावे.