व्यवसायासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक :माने

0

एसबीपीआयएममध्ये उद्योजक परिचय शिबिर

पिंपरी : उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी वित्तीय संस्था, बँका, शासनाचे नियम व अटी, यासाठी लागणारे मनुष्यबळ, उत्पादीत वस्तूची मागणी, विक्री पश्‍चात सेवा आणि स्पर्धेत टिकण्याची तयारी याबाबत सूक्ष्म नियोजन आवश्यक असल्याचे मार्गदर्शन ज्येष्ठ उद्योजक रामदास माने यांनी केले. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या निगडी येथील एसबी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता परिचय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रामदास माने बोलत होते. या वेळी केंद्राचे पुणे विभागीय संचालक सुरेश उमाप, एसबीपीआयएमचे संचालक डॉ. डॅनियल पेनकर, प्रकल्प अधिकारी मिलिंद लोंढे आदी उपस्थित होते. या वेळी रामदास माने यांच्या जीवनावर ‘ग्रामीण भागातील विद्यार्थी ते यशस्वी उद्योजक’ चित्रफित सादर करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन पीसीईटीचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव व्ही.एस.काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्‍वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. एमसीईडीचे विभागीय संचालक सुरेश उमाप, अशोक पत्तर, पंडीत गावडे, सुनील शेटे, सुभाष रणदिवे या तज्ज्ञांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिराच्या समारोपप्रसंगी यशस्वी उद्योजक सचिन गायकवाड, डॉ.कीर्ती धारवाडकर आणि हेमंत भागवत उपस्थित होते. यामध्ये व्यवस्थापन शाखेच्या 105 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे संयोजन डॉ.हंसराज थोरात, सूत्रसंचालन प्रा. प्रणिता बुरबुरे तर प्रा.ऋषिकेश कुमार यांनी आभार मानले.