वॉटरग्रेसच्या गैरव्यवहाराबाबत मनपाकडून गुन्हा दाखलच्या हालचाली

0

युनियन बँकेकडून व्यवहाराबाबत मागविली माहिती

वॉटरग्रेसच्या बँकेच्या खात्यावर मुखत्यारपत्र असलेले झंवर करत होते व्यवहार

जळगाव: महापालिकेने शहरातील स्वच्छतेचा ठेका दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीने व्यवहारासाठी युनीयन बँकेत खाते उघडले होते. या खात्याला व्यवहार करण्यासाठी कंपनीने सुनील देवकीनंदन झंवर यांच्या नावाने बँकेत मुखत्यारपत्र दिल्याचे समोर आले असून सुनील झंवर हेच वॉटरग्रेस संबंधित खाते चालवित होते. त्यामुळे याबाबत महापालिकेने युनीयन बँकेकडून याबाबत माहिती मागितली आहे. लवकरच ती माहिती बँकेकडून महापालिकेला पाठविली जाणार असून त्यानंतर महापालिकेकडून याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होण्याच्या शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

आमदार म्हटले होते भाजपचा संबंध नाही
महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीला शहरातच्या स्वच्छतेला ठेका दिला आहे. या ठेक्याबाबत करार करत असतांना सब ठेकदाराची करारात तरतूद नसतांनाही सब ठेकेदार म्हणून बीएचआर घोटाळ्यातील संशयित सुनील झंवर यांच्या साई मार्केटींगला सब ठेकदार दाखविण्यात आले. बीएचआरच्या घोटाळ्यानंतर आता महापालिकेतील वॉटरग्रेसच्या ठेक्यात सुनील झंवर यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली होती. यात आमदार सुरेश भोळे यांनी वॉटरग्रेसच्या ठेक्यासह सुनील झंवर तसेच भाजपचा कुठलाही संंबंध नसल्याचे पत्रकार परिषदेव्दारे स्पष्टीकरण दिले होते. यात गिरीश महाजन यांचाही कुठलाही संबंध नसल्याचेही यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले होते.

बँकेच्या व्यवहारातही झंवरच्या नावे मुखत्यारपत्र
वॉटरग्रेस कंपनीला स्वच्छतेचा ठेका मिळाल्यानंतर काही दिवसात काम बंद पडले. यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा वॉटरग्रेस कंपनीला ठेका देण्यात येवून कामाला सुरुवात झाली. यादरम्यान वॉटरग्रेस कंपनीने नवीपेठेतील युनीयन बँकेत खाते उघडले. संबंधित खात्यावर महापालिकेकडून कामाचे पैसे कंपनीला अदा करण्यात येत होते. खाते उघडल्यावर आठ ते दहा दिवसानंतर वॉटरग्रेस कंपनीचे मालक चेतन पृथ्वीराज बोरा यांनी सुनील देवकीनंदन झंवर यांच्या नावे संबंधित बँक खात्याला अनुसरुन स्टॅम्पपेपरवर मुखत्यारपत्र दिले. मुखत्यारपत्र मिळाल्यावर संबंधित खात्यावर व्यवहार सुनील झंवर यांनीच केला.

महापालिकेने बँकेकडून मागविली माहिती
ठेक्यात सब ठेकेदाराची तरतूद नसतांनाही सुनील झंवर यांच्या साई मार्केटींगच्या नावाने वॉटरग्रेस कंपनीकडून सब ठेकेदार म्हणून दाखविण्यात आले. या बेकायदेशी बाबीची महापालिकेकडून चौकशी सुरु आहे. दुसरीकडे वॉटरग्रेस कंपनीच्या बँक खात्याचे मुखत्यारपत्र सुनील झंवर यांनीच व्यवहार केले. त्यामुळे संबंधित खात्यावर महापालिकेकडून अदा करण्यात येणारे पैसे वॉटरग्रेस कंपनीच्या नावे सुनील झंवर यांनीच घेतल्याचा संशय असून या संपूर्ण व्यववराची तसेच खात्याबाबत माहिती महापालिकेकडून पत्र देण्यात येवून युनीयन बँकेकडून मागविण्यात आली आहे. लवकरच ती माहिती महापालिकेला देण्यात येणार असून चौकशीअंती महापालिकेकडून संबंधितांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता सूत्रांकडून
व्यक्त होत आहे.

Copy