वैद्यकीय परिक्षेत यश मिळविल्याबद्दल सत्कार

0

भुसावळ । मध्य रेल्वेचे मुख्य विभागीय कार्यालयातील सहाय्यक मंडळ अभियंता पी.एस. जाधव यांची मुलगी मोनिका जाधव ही चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयात बी.ए.एम.एस. परिक्षेत प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाली. याबद्दल विविध संघटनांतर्फे तिचा सत्कार करण्यात आला. मोनिका जाधव ही साकेगाव येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिला डॉ. सतिश सिंधाडकर, डॉ. संदिप दहिलीकर, डॉ. कोमलकुमार डाकलिया, डॉ. महाजन, डॉ. सारंग फालक यांचे मार्गदर्शन लाभले.

यांची होती उपस्थिती
डॉ. मोनिका यांच्या यशाबद्दल नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे अनिल मिसाळ, भारतीय बौध्द महासभेचे माजी शहराध्यक्ष जी.पी. सोनवणे, बौध्द महासभेचे कोषाध्यक्ष सुरेश दामोदरे, ईसीसी बँकेचे जानराव तायडे, एनआरएमयुचे एस.के. तायडे, प्रभाकर बोदवडे, बाळू गाढे, माजी नगरसेवक जे.पी. सपकाळे, अशोक निकम, एससी/एसटी असोसिएशनचे दिलीप देहाडे, कार्यालय अधिक्षक सुरेंद्र हिवाळे, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष सागर बहिरुणे, राजेश तायडे उपस्थित होते.