वैद्यकीय पथकांना सहकार्य करावे:प्रांताधिकारी

0

प्रांताधिकारी चेतनसिंग गिरासे यांचे आवाहन
शहादा: शहरात कोविड 19 च्या लागण झालेल्या प्रभाग 7 व 4 मध्ये निर्दिष्ट केलेले 2 कंटेन्मेंट झोनमध्ये 30 वैद्यकीय पथके कार्यरत आहे. प्रभागातील घरांची संख्या 3 हजार 119 तर 17 हजार 326 एवढी लोकसंख्या आहे. दोन्ही कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी अ‍ॅक्टीव्ह सर्व्हेलायन्स करताना वैद्यकीय पथकांना सहकार्य करावे, कोणतीही माहिती लपवू नये, असे आवाहन प्रांताधिकारी चेतनसिंग गिरासे यांनी केले आहे.

रविवारी आडत व्यापार्‍यांसोबत चर्चा करून भाजीपाला मार्केटबाबत नियोजन नगरपालिका प्रशासनमार्फत करण्यात आले. तसेच शेतकरी गटामार्फत घरोघरी वितरणासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून नियोजन करण्यात येत आहे. अक्षय तृतीयेच्या सणाच्या खरेदीसाठी काही प्रमाणात झालेली गर्दी चिंताजनक आहे. नागरिकांना सुरक्षिततेची आवश्यक काळजी घेतांना अनावश्यक बाहेर पडू नये, असेही आवाहन गिरासे यांनी केले. तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र पेंढारकर यांच्यातर्फे आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करण्याबाबत मशिदीतून आवाहन करण्यात आले.

Copy