वेश्या व्यवसायास भाग पाडले, विरोध केल्यावर संशयित जीवावर उठले

0

चोपड्यातील महिलेची आतबिती ः स्थानिक पोलीस दाद नसल्याने विशेष पोलीस महानिरिक्षकांची घेतली भेट

जळगाव: चोपडा नगर पालिकेच्या मागील गल्लीतील पस्तीस वर्षीय पिडीतेला गावगुंडानी बळजबरीने वेश्या व्यवसायाला भाग पाडून तीचे शोषण सुरु होते. या पिडीतेला तेथुन सोडवण्यास मदत करणार्‍याने तिच्याशी लग्नाचा बनाव करुन पुन्हा गैरकृत्याच्या दलदलीत ढकलून दिले. विरोध केल्यावर जिवेठार मारण्यासाठी तिच्या मागावर आहेत. जीवाला धोका असतांनाही स्थानिक पोलीस दादपुकार तसेच तक्रार घेत नसल्याने पिडीतेने थेट विशेष पोलीस महानिक्षिकांची भेट घेवून आपबिती कथन केली होती. तसेच लेखी निवेदन देवून कारवाईसाठी साकडे घातले होते. अखेर विशेष पोलीस निरिक्षकांच्या आदेशानुसार शनिवारी रात्री या पिडीतेच्या तक्रारीअर्जानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीनुसार गुन्हा दाखल करावा, यासाठी अशिक्षित महिलेने पोलिसांना चांगलेच हैराण करुन सोडले होेते. महिला कर्मचार्‍याने तिला शब्द न शब्द फिर्याद वाचून दाखविली यानंतर महिलेचे समाधान झाल्यावर गुन्हा दाखल झाला.

पुण्यातून आणून चोपड्यात वेश्याव्यवसायात अडकविले

पिडीतेने दिलेल्या तक्रारी नुसार, साधारण पंधरा वर्षापुर्वी पुण्यातून कविता बाई (काल्पनीक) या पिडीतेला आणुन चोपड्यातील वेश्या व्यवसायात अडकवण्यात आले होते. मात्र कुंटणखाना मालकीण कडून होणार्‍या छळाला कंटाळल्याने गावातीलच रविंद्र छबु सोनवणे (पाणीवाला) याने तेथून पिडीतेची सुटका करण्यास मदत केली होती. परिणामी पिडीतेचा त्याच्या वर विश्‍वास बसला नंतर त्यानेच लग्नाचे आमीष दाखवुन चोपड्यात आणले. गडावर रिती रिवाजा प्रमाणे विवाह केला, भाड्याने खोली घेवुन देत नव्याने संसारही थाटला मात्र, काही दिवसातच पिडीतेचा तोच छळ पुन्हा सुरु झाला. रविंद्रने कविताबाईचे अंगावरील दागीने गोडबोलून घेवून घेत त्याच वेश्यावस्तीत जागा घेवून नव्याने व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

जीपखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न

पिडीतेने आवाज उठवल्यावर 24 फेब्रुवारी रोजी चारचाकी जीप खाली चिरडून ठार माण्याचा प्रयत्न केला. तत्पुर्वी पिडीतेला आठ ते दहा गुंडांनी घरातून ओढून काढत बेदम मारहाण करुन अर्धमेल्या अवस्थेत सोडून पळ काढला होता. चोपडा ग्रामीण रुग्णालयात दाखल असतांना चोपडा शहर पोलिसांनी तक्रार करुनही दखल घेतली नाही. परिणामी पिडीतेने थेट नाशिक पोलिस महानिरीक्षकांची भेट घेवुन घडलेले आपबिती कथन केली.

त्यानुसार त्यांच्या आदेशानुासर पिडीतेच्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रविंद्र छबु सोनवणे, जितेंद्र ड्रायव्हर, बबलू, बंटी वाघ, किरण मराठे, रविंद्र मराठे, मंगलाबाई मराठे, संजु भालेराव, भोला कोळी यांच्या विरुद्ध बलात्कार, प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन शुन्य क्रमांकाने गुन्हा चोपडा शहर पोलिसांना वर्ग करण्यात आला आहे.