वेल्हाळे शिवारात कुजलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळला

0

भुसावळ : मुक्ताईनगर वनपरीक्षेत्रातील वरणगाव-वेल्हाळा वनक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून बिबट्याची शिकार झाल्याचा संशय आहे. वनविभागाकडून याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर वेल्हाळा शिवारातून कोतवाल सद्या मोरे (40) व कालू कोतवाल मोरे (20) या पिता-पूत्रांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांनी बिबट्याची दात व हाडे काढून दिली आहेत.

वनविभागाच्या अधिकार्‍यांची धाव
वेल्हाळा-वरणगाव वनपरीक्षेत्रात बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक वनसंरक्षक चि.रा. कांबळे, मुक्ताईनगरचे वनपरीक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव, वनपाल एल.डी.गवळी, वनरक्षक मुकेश बोरसे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. घटनास्थळी केवळ बिबट्याची केवळ कातडी व शेपूट पथकाला आढळली तर नख व दात काढून नेण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिबट्याच्या शरीराच्या अवशेषांचे नमुने पीसीएमबी हैद्राबाद प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बिबट्याची शिकार झाली की अन्य कुठल्या कारणाने त्याचा मृत्यू झाला हे तपासणी अहवालाअंतीच स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Copy