वेगवेगळ्या आंदोलनांनी उठवले रान

0

धुळे। धुळ्यात गुरुवार हा आंदोलनाचा वार ठरला. वेगवेगळ्या आंदोलनांनी धुळ्यामध्ये अक्षरशा रान उठविले. शेतकर्यांबद्दल अत्यंत खालच्या भाषेत बोलणार्या, राज्यातील शेतकर्यांचा घोर अपमान करणार्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या तोंडात काँग्रेसने शेण घातले तर शिवसेनेने काळे फासले, चप्पलांनी झोडपले. तर लक्ष वेधूनही रस्ते दुरुस्त होत नसल्याने देवूपरातील नगरसेविका प्रतिभाताई चौधरी यांनी चक्क दि 11 रोजी गणपती कॉलनीत खड्ड्यात बसून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तर मनपाच्या नगररचना विभागाचा भोंगळ कारभार आणि वसूली विभागाची पठाणी कारवाईच्या निषेधार्थ दि 12 रोजी धुळे महानगर समाजवादी पार्टीने नपा आवारात ठिय्या आंदोलन केले.

पाणी टंचाईसाठी मनपात ठिय्या आंदोलन
शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून पाणी असूनही जनतेला पाणी मिळत नसल्याने नागरीकांचे हाल होत आहेत. केवळ कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने नागरीक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. त्यातच मनपाच्या नगररचना विभागाचा भोंगळ कारभार आणि वसूली विभागाची पठाणी कारवाईच्या निषेधार्थ दि 12 रोजी धुळे महानगर समाजवादी पार्टीने नपा आवारात ठिय्या आंदोलन केले. शहराला पाणीपुरवठा करणार्या नकाणेसह तापी योजनेत पुरेसे पाणी असतांना केवळ नियोजनाचा अभाव असल्याने शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मनपाचा भोंगळ कारभार सुरु असून वाखारकरनगरची टाकी पूर्ण होवूनही तेथून पाणीपुरवठा होत नाही तर जामचा मळा भागातील पाण्याच्या टाकीचे काम संथ गतीने सुरु आहे. त्यातच नगररचना विभागाने नविन मालमत्ता मोजणी अंतर्गत दुरुस्ती केलेल्या घरांनाही सहा-सहा वर्षे दंडात्मक कर आकारणी करुन हुकूमशाही चालविली आहे. बांधकाम परवानगी वेळेत न देणे, फाईल गहाळ होणे, अधिकारी जागेवर न राहिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले गेले. सुरुवातीला मनपा आवारात ठिय्या मांडणार्या स.पा.कार्यकर्त्यांनी दुपारी आयुक्तांच्या दालनासमोर बस्थान मांडले. या आंदोलनात अकिल अन्सारी, गोरख शर्मा, कल्पना गंगवार, जमील मन्सुरी, अमिन पटेल, साबीर पत्रकार, डॉ.दिपश्री नाईक, डॉ.बी.यु.पवार, अकिल शाह, रशिद शाह, इनाम सिद्दीकी, गुलाम कुरेशी, आलमगीर शेख,फातमा बी शेख, गुड्डु काकर, नुरखा पठाण, शकिल अन्सारी, सादिक असलम, डॉ.अबुलहसन, नाविद अख्तर, अली अजहर खान, जाकीर खान, आसिफ पठाण, रशिद अब्दुल मतीन, आसिफ अन्सारी, मुबीन अन्सारी, नेहाल अन्सारी यांच्यासह असंख्य नागरीकांची उपस्थिती होती.

सुकवद ग्रामस्थांनी खुर्चीला हार घातला
शिंदखेडा । सुकवद ग्रामस्थ व तालुका शिवसेनेच्या वतीने येथील सीटी सर्व्हे कार्यालयातील अधिका-यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील सुकवद ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या सिमा निश्चित करून देण्यात याव्यात म्हणून येथील भूमापन कार्यालयात (सीटी सर्व्हे) दोन वर्षापूर्वी अर्ज केला होता. या दरम्यान गावचे सरपंच मीनाताई पाटील, तलाठी जी.बी.पाटील,ग्रामसेवक जी.आर.पटेल यांनी संबंधित कार्यालयात दोन वर्ष चपला झिजवल्या परंतू कार्यालयातील भूमापन अधिकारी पवार यांनी अर्ज नाही आला. अर्ज सापडत नाही, नवीन अर्ज करा अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर संतप्त ग्रामस्थांनी शिवसेनेच्या मदतीने भूमापन कार्यालयात धडक दिली. भूमापन अधिकारी पवार नसल्याने ग्रामस्थांनी रिकाम्या खूर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला. ग्रामस्थांचे व शिवसेना पदाधिकार्यांचे संताप पाहता अर्जाची शोधाशोध केली असता दोन वर्षापूर्वी केलेला अर्ज सापडला. अर्जाची कार्यवाही तात्काळ करण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात सेनेचे(ग्रामीण)जिल्हाप्रमुखख हेमंत साळुंखे, तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, सर्जेराव पाटील, सुकवद सरपंच मीनाताई पाटील ,उपसरपंच प्रकाश पवार, अर्जून पवार,नागराज पाटील,दिलीप खैरनार व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

खा. रावसाहेब दानवे यांचा निषेध
शेतकर्‍यांबद्दल अत्यंत खालच्या भाषेत बोलणार्‍या, राज्यातील शेतकर्यांचा घोर अपमान करणार्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या तोंडात काँग्रेसने शेण घातले तर शिवसेनेने काळे फासले, चप्पलांनी झोडपले. शेतकर्यांचा अवमान करणार्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून धुळ्यातील युवक काँग्रेसने दि 11 रोजी स्वस्तीक चौकात त्यांच्या फोटोला शेण घालून निषेध व्यक्त केला तर शिवसेनेने देखील स्वस्तीक चौकातच दानवेंच्या फोटोला काळे फासून चप्पल-जोड्यांचा प्रसाद दिला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची शेतकर्यांबाबत बोलतांना जीभ घसरली एक लाख टन तुर खरेदी केली, तरी रडतात साले, असे वादग्रस्त आणि शेतकर्यांची अवहेलना करणारे बेताल वक्तव्य केल्यामुळे महानगर पालिकेच्या चौकात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब दानवे यांच्या फोटोला धुळे जिल्हा युवक काँग्रेसने शेण खाऊ घातले तसेच तिव्र घोषणाबाजी करत सरकारचा व दानवेंचा निषेध केला. यावेळी त्यांनी त्यांच्या सर्व पदांचे राजीनामे द्यावे, अशी मागणीही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. दानवे यांचा निषेध करतांना युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश काटे, महिला प्रदेश सचिव प्रभा परदेशी, जावेद शाह, रफीक शाह, डॉ. कैलास सोनवणे, बानु शिरसाठ, योगेश विभुते, मोहसिन तांबोळी, दादा कर्पे, रीजवान अन्सारी, महेश कालेवार, तौसिफ खाटीक, अबुलास खान, सतीश रवंदळे, हरीष पाटील, विनोद गर्दे, मसुद सरदार, राजीव पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, सतीश महाले, किरण जोंधळे, कैलास मराठे, संजय गुजराथी, रामदास कानकाटे, संदीप सूर्यवंशी, पंकज गोरे आदी सहभागी झाले होते.

नगरसेविकेने खड्ड्यातच मांडले ठाण
शहरात सर्वत्र रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असतांना मनपाला प्रशासनाला निवेदन देवून, सभेत लक्ष वेधूनही रस्ते दुरुस्त होत नसल्याने देवूपरातील नगरसेविका प्रतिभाताई चौधरी यांनी चक्क दि 11 रोजी गणपती कॉलनीत खड्ड्यात बसून प्रशासनाचा निषेध व्यक्त करत रस्त्यावरील खड्ड्यांकडे लक्ष वेधले. यासंदर्भात प्रतिक्रिया देतांना प्रतिभाताई म्हणाल्या की, मनपाने 92 टक्के वसुली केल्याचा डांगोरा पिटणे सुरु केले आहे, सर्वाधिक कराची रक्कम ही देवपूर परिसरातील नागरीक भरतात. तरीही या भागातील रस्ते खड्डेमय झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी मनपाकडे निधी नाही, रस्ते दुरुस्तीकरीता वारंवार निवेदने देण्यात आलीत. आंदोलने केलीत, स्थायीसह महासभेत प्रश्‍न उपस्थित केले, मात्र, रस्ते दुरुस्त झालेच नाहीत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अखेरीस आज मलाच खड्ड्यात बसून आंदोलन करावे लागले. गरुड कॉलनी, गणपती मंदिर रोड येथील खड्ड्याच्या बाजूने रांगोळी काढून त्यांना फुले वाहण्यात आलीत. शिवाय, 92 टक्के वसुली तरी जनतेचे हाल, मनपा प्रशासन मात्र मालामाल, असे उपरोधिक वाक्य लिहून या आंदोलनाकडे लक्ष वेधून घेतले. त्यांच्यासमवेत या आंदोलनात त्यांच्यासमवेत डी.आर. पाटील, संजय जोग, दिनकर जाधव, किशोर पाटील, सागर जाधव, डॉ.किशोर जाधव, शुभम सुर्यवंशी, कुसुम पाटील, सरला जाधव, अनुजा जोग, शुभांगी मोराणकर, स्वाती सोनगीरे आदी सहभागी झाले होते.

शिंदखेड्यातही दानवे यांचा निषेध
शिंदखेडा – भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी काल शेतकर्‍यांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा भगवा चौक शिंदखेडा येथे शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला पायताण मारून निषेध व्यक्त करण्यात आला,त्यावेळी उपस्थित मा.विठ्ठलसिंग आण्णा गिरासे,मा.देवा बापू कोळी,मा.प्रकाश नाना चौधरी,मा.भाऊसाहेब पाटील,मा.दिपक जगताप,मा.राहुल कचवे,मा.भुरा परदेशी,मा.निलेश निकम,निलेश देसले,जयपाल गिरासे,शानाभाऊ कोळी,सुनिल पाटील,भुपेंद्र भदाणे,राजु देसले व युवक तालुकाध्यक्ष चेतन पाटील आदि.