वृध्देला रिक्षातून जंगलात नेले अन् अश्‍लिल चाळे करुन केली बेदम मारहाण

0

पिंप्राळा हुडको परिसरातील घटना ; अमळनेर तालुक्यातील वृध्देवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

जळगाव- बस प्रवासाच्या तिकिटात सवलत मिळावी म्हणून यासाठी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी अमळनेर तालुक्यातील पिंप्री येथील 57 वर्षीय वृध्द जिल्हा रुग्णालयात आली. याठिकाणाहून एका अज्ञात व्यक्तीने वृध्देला पिंप्राळा हुडको परिसरातील जंगलात घेवून जावून तिचे कपडे काढून तिच्यासोबत दारूच्या नशेत अश्‍लिल चाळे केले अन् त्यास विरोध केला असता संबंधिताने वृध्देला बेदम मारहाण केल्याची माणुसकीला काळीमा भासणारी धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 11 घडली. परिसरातील नागरिकांच्या प्रकार लक्षात आल्यानंतर वेळीच महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान घटनेमुळे वृध्द महिला तसेच परिसरातील नागरिक कमालीचे घाबरले आहेत.

हिंदी भाषिक व्यक्तीने रिक्षातून जंगलात नेले.
अमळनेर तालुक्यातील पिंप्री येथील 57 वर्षीय वृध्देचे पती 3 महिन्यांपूर्वी वारले आहेत. बस प्रवासात सवलत मिळावी यासाठी ज्येष्ठ नागरिक असल्याबाबत कार्ड काढण्यासाठी वृध्द महिला 20 रोजी जिल्हा रुग्णालयात आली. यादरम्यान सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एक हिंदी भाषेत बोलत असलेला व्यक्ती अला. त्याने वृध्देला माझ्यासोबत चल असे म्हटले. महिला सोबत जाण्यास तयार झाली. यानंतर संबंधिताने महिलेला रिक्षात बसविल, रस्त्यात पावभाजी घेतली. काही अंतरावर रस्त्यात त्याने मद्याची बाटलीही घेतली.

शरीरसुखाची मागणी करुन केली बेदम मारहाण
मद्याची बाटली व पावभाजी घेतल्यानंतर हिंदी भाषिक व्यक्ती वृध्देला घेवून पिंप्राळा हुडको परिसरातील निर्मनुष्य असलेल्या घनदाट जंगलात घेवून गेला. याठिकाणी त्याने पावभाजीसोबत मद्य रिचवले. यानंतर दारुच्या नशेत महिलेला माझ्या घरी चल असे म्हणाला. महिलेने नकार दिल्यानंतर मला तुझ्यासोबत झोपू दे, असे म्हणत शरीरसुखाची मागणी केली. यासह नकार दिला असता संबंधिताने वृध्देच्या अंगावरील कपडे फाडले, तिच्यासोबत अश्‍लिल चाळे करुन तिला चापटा बुक्क्याने तोंडावर, डोळ्यावर बेदम मारहाण केली. महिलेले त्यास प्रतिकार करुन आरडाओरड केल्याने पळाला. रिक्षाचालकासह रिक्षा घेवून घटनास्थळाहून पसार झाला.

नागरिकांमुळे महिला वेळीच जिल्हा रुग्णालयात दाखल
महिलेच्या आरडाओरडमुळे शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकिर पठाण यांनी सचिन सोनवणे, इस्माईल शेख, मुस्ताक पिंजारी नाजिम खान यांच्यासह कार्यकर्त्यांसह त्याठिकाणी धाव घेतली. व रामानंद नगर पोलिस स्टेशनचे प्रदिप चौधरी यांना दूरध्वनी वरुन घटनेची माहिती दिली. प्रदीप चौधरी यांनी तातडीने पोलीस निरिक्षकांना प्रकार कळविला. पोलीस उपनिरिक्षक रोहिदास ठोंबरे व कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठले. बेदम मारहाण झाल्याने महिला जखमांच्या त्रास सोसत विव्हळत पडली होती. तिला तातडीने पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्या उपचार सुरु आहेत. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात महिलेच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रोहिदास ठोंबरे करीत आहे. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमधील फुटेजची तपासणी करुन लवकरच संशयित हाती लागावा यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

Copy