वृध्देची पोत लांबविणार्‍या संशयितांला एलसीबीकडून अटक

0

जळगाव: गरिब महिलांना साड्या वाटप करुन 251 रुपयांत बांगड्या भरण्यात येत असल्याची बतावणी केली. गर्दी असल्याने त्याच्याजवळील पिशवीत सोन्याची पोत व चपला टाकायला सांगून बसवले. त्यानंतर तुळसाबाई दयाराम चौधरी (वय 72 रा. संत मुक्ताबाई नगर) या वृध्द महिलेची दोन तोळ्यांची 80 हजार रुपयांची मंगलपोत घेऊन चोरटा पसार झाल्याची घटना 15 रोजी दुपारी 1 वाजता फुले मार्केटमध्ये तेल भांडाराजवळ घडली होती. शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने पोत लांबविणार्‍या अशोक सुरेश दहेकर वय – 40 रा.मोगलाई , धुळे यास ताब्यात याच्या मुसक्या आवळल्या आहे. त्याच्याकडून मंगलपोत हस्तगत करण्यात आली आहे.

80 हजार रुपयांची पोत हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांनी चोरट्याच्या शोधार्थ सहाय्यक फौजदार अशोक महाजन, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, सुनिल दामोदरे, मनोज दुसाने, किरण चौधरी , प्रविण हिवराळे, परेश महाजन अशांना रवाना केले होते. धुळे शहरातील अशोक दहेकर हा गुन्ह्यात निष्पन्न झाल्याने पथकाने तो राहत असलेल्या मोगलाई भागात सापळा रचून त्यास ताबयात घेतले. त्याच्याकडून तुळसाबाई चौधरी यांची 80 हजार रुपयांची पोत हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपासकामी त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दहेकर यांच्याकडून धुळे, जळगाव तसेच नाशिक जिल्हयातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Copy